धुळे : धुळ्यात रिक्षातून घरी जाणाऱ्या 21 वर्षीय तरुणीवर चाकूहल्ला झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. यातच हा प्रकार समोर समोर आल्याने पुन्हा खळबळ माजली आहे.


 

धुळ्यातील शिंदखेडा-चिरणे मार्गावर हा हल्ला झाला आहे. 21 वर्षीय तरुणी घरी जाताना हल्लेखोराने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पण या तरुणीने त्याला प्रतिकार केल्याने हल्लेखोराने तिच्यावर चाकूने वार केले. या चाकूहल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

गेल्या काही दिवसात मराठवाड्यात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या बातम्यांनी महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला होता. यातच खान्देशातही महिला सुरक्षित नाहीत हे समोर आलं आहे.