धुळे : बिबट्याच्या धसक्याने साडेचारशे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना धुळ्यातील चिकसे गावात घडली आहे. पोल्ट्रीच्या जाळीजवळून बिबट्या जातानाची दृश्यं सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. बिबट्याच्या या धसक्यामुळेच कोंबड्यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज गावकऱ्यांनी बांधला आहे.

या परिसरात गेल्या 2 वर्षांपासून बिबट्याचा वावर आहे. गावकऱ्यांनी याबाबत अनेकदा वन विभागाकडे तक्रार केली आहे. परंतु वन विभागाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याची संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

चिकसे गावातील अविनाश पाटील या शेतकऱ्याच्या शेतात पोल्ट्रीचे दोन शेड आहेत. या दोन्ही शेडमध्ये प्रत्येकी साडेसात हजार पक्षी (कोंबड्या)आहेत. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास याठिकाणी एक बिबट्याने धुमाकूळ घातला होता. याचा पिंजऱ्यातील कोंबड्यांनी धसका घेतला होता. या धसक्यामुळे सुमारे साडेचारशे कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.

व्हिडीओ पाहा