Continues below advertisement

Dharashiv:धाराशिवमध्ये पोस्ट ऑफिस बॉम्बने उडवून देणार असल्याचा निनावी मेल आला आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे. धाराशिव शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस बॉम्बने उडून देणार असल्याचा मेल आल्याने पोस्ट कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. डॉगस्कॉड , बॉम्बशोधक पथकाकडून पोस्ट ऑफिसची तपासणी करण्यात आली आहे.

बॉम्बशोधक पथकाने पोस्ट ऑफिस मधील अनेक पार्सल कसून तपासले आहेत. एका संशयित पार्सलची तपासणी केली असता, पार्सल मध्ये कॉम्प्युटरचे साहित्य आढळून आले आहे. कोणताही धोका नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

Continues below advertisement

हिंगोलीचे पोस्ट ऑफिस बॉम्ब ने उडवण्याची धमकी

हिंगोलीचे पोस्ट ऑफिस बॉम्ब ने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलवर धमकी मिळाल्याने तत्काळ सर्वाधिकारी कर्मचारी बाहेर काढत पोस्ट ऑफिस खाली करत सर्व नागरिकांना बाहेर काढलं आहे. आता घटनास्थळीडॉग्स कोड आणि बॉम्ब शोधक पथक दाखल झाले आहे. अज्ञात व्यक्तीने उडवण्याची धमकी दिल्याने पोस्ट ऑफिस परिसरात पोलिसांचा फौज फाटा दाखल झाला आहे. बॉम्बशोधक पथक आणि डॉग्सच्या साह्याने संपूर्ण कार्यालयाची छान बिन सुरु आहे.