बीड : माझ्या 25 वर्षाच्या सार्वजनिक आयुष्यामध्ये राजकारणाचा इतिहासामध्ये काम करत असताना तुम्ही जो मला आशीर्वाद दिला प्रेम दिलं विश्वास दिला ते इथून पुढच्या आयुष्यात काम करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देईल. उतणार नाही मातणार नाही तुम्हाला दिलेला शब्द खाली पडू देणार नाही, असे मत बीड पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मूळ गावी नाथरा इथल्या विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.


मुंडे कुटुंबाचे मूळ गाव असलेल्या नाथरा गावामध्ये आज विविध कामांच्या विकासाचा शुभारंभ झाला यावेळी छोटेखानी कार्यक्रमातच गावकऱ्यांच्या वतीने धनंजय मुंडे यांचं स्वागत करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच धनंजय मुंडे यांना भला मोठा हार घालण्यात आला.


नाथऱ्यामध्ये झालेल्या स्वागताने धनंजय मुंडे गहिवरले होते यावेळी व्यासपीठावरून त्यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी जाग्या केल्या. अगदी 20 ते 25 वर्षांच्या राजकीय संघर्षामध्ये नात्यातील लोक आपल्या पाठीशी कसे खंबीरपणे उभे टाकले हे ही सांगितले.


सुभा केला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद मिळणार होते मात्र तेही अचानक बदलले गेले. त्यानंतर आमदार की मिळणार होती मात्र तीही मिळाली नाही यावेळी राजकारणामध्ये ध चा प कसा झाला याचा उल्लेख सुद्धा धनंजय मुंडे यांनी जाहीर कार्यक्रमात केला..


जगात कितीही कौतुक झाले सत्कार झाले आशीर्वाद मिळाले तरीही आपल्या मातीत आपला झालेल्या सत्काराची किंमतच करता येत नाही. त्यामुळे केवळ राज्यातच नाही तर देशात या मातीचे नाव केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असेही मत यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं.