माढा (पंढरपूर) : ‘स्वतः मुख्यमंत्रीच अकार्यक्षम आहेत. त्यामुळे आता जनताच त्यांना नारळ देईल.’ अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली. ते माढामधील साखर कारखान्याच्या एका कार्यक्रमानंतर बोलताना त्यांनी एबीपी माझाकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
राज्यातील सगळे सरकारच अकार्यक्षम असून कोण कोणाला काढणार? आता वैतागलेली जनताच यांना नारळ देईल. अशी सडकून टीका धनंजय मुंडें यांनी यावेळी केली.
‘येत्या निवडणुकीत जनताच या सरकारला ऑफलाईन करुन टाकेल’
कर्जमाफी जाहीर केल्यापासून चार महिन्यात ९९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्याच नाही तर योजनेला छत्रपतींचे नाव देऊन त्यांचाही अपमान केल्या. हे सरकार शेतकरी ही जाताच मुळापासून संपवू पाहत आहे. सगळं ऑनलाईन करा म्हणणाऱ्या सरकारला येत्या निवडणुकीत जनताच ऑफलाईन करुन टाकेल. असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
‘राज्यावरील कर्जाचा बोजा सव्वा चार लाख कोटींवर’
राज्यावरील कर्जाचा बोजा सव्वा चार लाख कोटींवर गेला असून ३ वर्षात दीड लाख कोटी कुठे गेले याचे उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावेच लागणार आहे. असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. राज्यभर
‘सरकारनं शेतकऱ्याला उद्ध्वस्त करु नये’
चांगला पाऊस झाला असताना आता गेल्या वर्षीच्या दुष्काळातील वीजबिलासाठी सरकार शेतकऱ्यांच्या वीज तोडू लागली आहे. असं करुन सरकारनं शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचे उद्योग सरकारने करु नयेत. असा इशाराही मुंडेंनी दिला.
स्वतः मुख्यमंत्रीच अकार्यक्षम, जनताच त्यांना नारळ देईल : धनंजय मुंडे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Oct 2017 11:15 PM (IST)
‘स्वतः मुख्यमंत्रीच अकार्यक्षम आहेत. त्यामुळे आता जनताच त्यांना नारळ देईल.’ अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -