जालना : शेतकऱ्यांच्या छातीवर नव्हे, पायांवर गोळीबार करायला पाहिजे होता, असं वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा धनंजय मुंडे यांनी समाचर घेतला. “शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्या आणि पायांवर गोळ्या मारायला हव्य होत्या, असे म्हणणाऱ्या दानवेंच्याच बु***वर आता गोळी मारण्याची वेळ आली आहे.”, असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दानवेंवर निशाणा साधला.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे हल्लाबोल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना धनंजय मुंडेंनी दानवेंचा समाचार घेतला.

नगर जिल्ह्यात ऊस दरासंदर्भात आंदोलन सुरु असताना पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर दानवे यांनी शेतकऱ्यांच्या पायावर गोळीबार करायला हवा होता, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज धनंजय मुंडेंनी दानवेंच्या त्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेत आता दानवेंच्याच बु***वर गोळी मारण्याची वेळ आली असल्याचं सांगून दानवेंच्या कारभाराचा समाचार घेतला.

शिवाय, ‘मी लाभार्थी’च्या जाहिरातीत लाभ झालेल्या प्रत्येक व्यक्तीला या सरकारच्या काळात नव्हे, तर आघाडी सरकारच्या काळातच शासकीय योजनांचा लाभ झाल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केला.

VIDEO : पाहा धनंजय मुंडे काय म्हणाले?