मुंबई : कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत राम शिंदेंचा फोटो असल्याचा दावा करणाऱ्या धनंजय मुंडे यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर ट्वीटद्वारे मुंडेंनी दिलगिरी व्यक्त केली.

 

राम शिंदेंसोबत फोटोत असलेली व्यक्ती कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केला होता. शिवाय, राम शिंदेंच्या राजीनाम्याचीही त्यांनी मागणी केली होती.

https://twitter.com/dhananjay_munde/status/754682474362535936

त्यानंतर, राम शिंदेंसोबत फोटोत असणारी व्यक्ती कोपर्डी प्रकरणातील आरोपी नाही. त्यामुळे आरोप करणाऱ्यांनी राम शिंदेंची जाहीर माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

 

https://twitter.com/dhananjay_munde/status/754684031372029952