कोपर्डी प्रकरण: राम शिंदेंसोबत फोटोत असलेली ‘ती’ व्यक्ती आरोपी नाही
एबीपी माझा वेब टीम | 17 Jul 2016 01:48 PM (IST)
कर्जत (अहमदनगर) : अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्यासोबत फोटोमध्ये असणारी व्यक्ती कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी संतोष भवाळ नाही, अशी माहिती समोर आली आहे. राम शिंदे यांच्यासोबत असलेली व्यक्ती संतोष नाना भवाळ असून, तो भाजपचा कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. एकाच नावाचे दोन व्यक्ती आहेत. आरोपी वेगळा असून, राम शिंदेंसोबत फोटोत असणारी व्यक्ती आरोपी नाही. दरम्यान, राम शिंदेंसोबत फोटोत असणारी व्यक्तीने आता जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.