Jalna: मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात राजकीय सामाजिक वातावरण गढूळ झाले आहे. वाल्मिक कराडवर (Walmik Karad) मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याने वाल्मिक कराड पुरता अडकला आहे. दरम्यान, संतोष देशमुखांच्या हत्येच्या कटात असणाऱ्या सर्व आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उंच टाकीवर आंदोलन केल्यानंतर या आंदोलनात मराठा आंदोलक मनोज जरांगेही (Manoj Jarange) उतरले. संतोष देशमुखांची मनधरणी करताना, त्यांना टाकीवरून खाली उतरवून या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता धनंजय देशमुख तिसऱ्यांदा आंतरवली सराटीमध्ये दाखल झाले आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर मनोज जरांगे आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यात बंद दाराआड दीड तास चर्चा झाली. वाल्मीक कराडवर  मकोका अंतर्गत कारवाई होऊन वाल्मीक कराडला  7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, त्यामुळे या भेटीला महत्व होतं, दरम्यान या दोघांमध्ये अंतरवलीमध्ये बंद दाराआड दीड तास चर्चा झाली.


दोन दिवसापूर्वी मनोज जरांगे यांची तब्येत खालावली होती. त्यादिवशी बोलणं न झाल्यामुळे आपण भेटीसाठी आल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं. तर तर न्याय मिळवण्यासाठी आमच्या दोघात चर्चा झाल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं..


काय म्हणाले धनंजय देशमुख?


मनोज जरांगेंच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची दोन तीन दिवसांपूर्वी तब्येत खराब झाली होती. ते ॲडमिट झाले होते. पण माझी आणि त्यांची परवा भेट झाली पण जास्त बोलता आलं नाही. मला सहज वाटलं दादांची भेट घ्यावी. ज्या ज्या वेळेस वाटतं भेट घ्यावी त्यावेळेस भेट घ्यायला येतो. दरम्यान वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी देण्यात आली ही चांगलीच गोष्ट असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री साहेब तपास चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे. न्याय मिळाला पाहिजे ही आमची पण अपेक्षा आहे असं धनंजय देशमुख म्हणाले.


धनंजय देशमुखांना भेटल्यानंतर मनोज जरांगे म्हणाले..


धनंजय देशमुखांना भेटल्यानंतर मनोज जरांगे म्हणाले, “धनंजय मुंडे यांच्या टोळीने संतोष देशमुख यांचा संसार उद्ध्वस्त केला आहे. या कुटुंबावर मोठे संकट आले असून, संपूर्ण राज्याने आणि मुख्यमंत्र्यांनीही हे समजून घेतले आहे. आता फक्त न्याय मिळाला पाहिजे, त्यापलीकडे कोणतीही चर्चा होऊ शकत नाही.” “मुंडे यांच्या काही समर्थक आरोपींना वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत. अशा हालचाली राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणाऱ्या आहेत. आरोपींना वाचवण्यासाठी गुंडगिरी केली जात आहे. यामुळे देशमुख कुटुंब भयाच्या छायेत आहे, ही परिस्थिती जिल्ह्यावरही परिणाम करत आहे.” या टोळ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. या गुंडांना समाज, जनता, किंवा न्यायाचे भान नाही. मुख्यमंत्री आणि सरकार हे गांभीर्याने घेत आहेत, आणि चौकशीतून सत्य समोर येईल. असे जरांगे म्हणाले. “धनंजय देशमुख आले, त्यांना आम्ही परिस्थिती समजावून सांगितली. त्यांचे सांत्वन केले आणि धीर दिला. पण ही परिस्थिती राज्याला गुंडगिरीच्या दिशेने नेऊ पाहतेय, हे वेळीच थांबवले पाहिजे.” एसआयटी आणि सीआयडी चौकशीला पाठिंबा देत आणि या चौकशीतून आरोपींवर कठोर कारवाई होईल, असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केला.


हेही वाचा:


Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...