Dhananjay Deshmukh: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका असणाऱ्या वाल्मीक कराडांवर मकोकाअंतर्गत (MCOCA ) गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर कारवाईच्या प्रक्रियांना वेग आला आहे . आज पुन्हा एकदा केज न्यायालयात वाल्मीक कराड (walmik Karad ) यांना हजर करण्यात येणार असून परळीत तणावपूर्ण शांतता आहे .वाल्मीक कराड यांच्या अटकेचे परळीत पडसाद उमटले आहेत . निम्म्याहून अधिक बाजारपेठा आजही बंद आहेत .दरम्यान, आमच्या कुटुंब प्रमुखाचे आणि हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे . तसेच हत्येच्या कटकारस्थानात सामील असलेल्या सर्व आरोपींना शिक्षा होणे हीच मागणी असल्याचं सांगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी नव्याने समिती गठित करण्याच्या मागणी संदर्भात घेतलेला आक्षेपांवर मुख्यमंत्रीच निर्णय घेतील असं म्हटलंय .
नव्या SIT मध्ये दोन नवीन 2 जणांची नेमणूक करावी या शिफारसीवर आज एसआयटी प्रमुख बसवराज तेली यांच्याशी चर्चा होणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं . परळीतील लोकांना काय उत्तर द्यायचं हे प्रशासनाचे काम आहे . ते उत्तर देतील .ज्याच्या घरात खून झाला तो न्याय मागतोय . आम्ही कुठलाही दबाव निर्माण केला नाही .असंही ते म्हणाले .
काय म्हणाले धनंजय देशमुख?
सीआडी ऑफिसरनी 31 डिसेंबरच्या सुनावणीदरम्यान केलेल्या दाव्यानुसार, खंडणी आणि खून या दोन्ही गोष्टींचं कनेक्शन आहे. तपासातून हे निष्पन्न झालं असेल तर त्यावरच सगळा निकाल असणार. आमची मागणी या जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे हीच आहे. कटकारस्थानं करताना जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. SIT चे प्रमुख बसवराज तेलींशी काल झालेल्या भेटीनुसार, दोन अतिरिक्त लोक तपासासाठी नेमावेत अशी शिफारस आम्ही केली होती. यावर आज चर्चा होणार आहे.
आमच्या कुटुंब प्रमुखाची ज्यांनी हत्या केली, त्यांना फाशी झाली पाहिजे," अशी आमची प्रमुख मागणी आहे, असे कराड कुटुंबीयांनी स्पष्ट केले. सीआयडीने खंडणी आणि खुनातील आरोपी सारखे असल्याचा दावा केला आहे, मात्र आमची मागणी केवळ हत्येच्या कटकारस्थानात सामील असलेल्या सर्व आरोपींना शिक्षा होणे हाच आहे. एसआयटीमध्ये दोन लोकांना सहभागी करण्यासंदर्भात आमची मागणी आहे, पण यावर अद्याप चर्चा झालेली नाही. आज आम्ही या संदर्भात पुन्हा चर्चा करू. गरज भासल्यास, आम्ही बसवराज तेलींशी प्रत्यक्ष भेट घेऊ. आम्ही कुठलाही दबाव निर्माण केला नाही, आमचा भाऊ गेला आहे आणि आम्ही केवळ न्याय मागतोय.
SIT ची समिती आता गती घेत आहे - धनंजय देशमुख
"परळीतील लोकांना काय उत्तर द्यायचं हे प्रशासनाचे काम आहे. ते उत्तर देतील," असेही कराड कुटुंबीयांनी सांगितले. एसआयटी संदर्भात कराड कुटुंबीयांनी जे आक्षेप घेतले, त्या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे ते म्हणाले."ज्यावेळी आरोप केले होते, त्यावेळी सर्व समाजाचे म्हणणे होते की ज्यांचे फोटो आरोपांसोबत आहेत, ते काय न्याय देतील? म्हणून आम्ही नव्याने समिती गठित करण्याची मागणी केली होती. ती समिती आता गती घेत आहे," असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, "आम्ही न्याय मागत आहोत आणि तपास योग्य दिशेने व्हावा, हीच आमची मागणी आहे."
हेही वाचा