शिर्डी (अहमदनगर) : नोटबंदीच्या निर्णयानंतर एक महिन्यात साई चरणी तब्बल 17 कोटी 43 लाखांच दान प्राप्त झाल असून दान पेटी, ऑनलाईन, देणगी काऊंटरवर, त्याचसोबत डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून हे दान प्राप्त झालं आहे.
विशेष म्हणजे साई चरणी जुन्या नोटाही मोठ्या प्रमाणात अर्पण केल्या गेल्या आहेत. नवीन आलेल्या दोन हजारांच्याही नोटा दान पेटीत मिळाल्या आहेत.
गेल्या महिन्यात नोटबंदीच्या निर्णयानंतर साई चरणी एकूण 17 कोटी 43 लाख रुपयांचं दान विविध माध्यमातून प्राप्त झाले.
- दानपेटी - 10 कोटी रुपये
- ऑनलाईन देणगी - 97 लाख 17 हजार
- देणगी काऊंटर - 1 कोटी 65 लाख
- चेक डीडी - 2 कोटी रुपये
- डेबिट व क्रेडिट कार्ड - 1 कोटी 20 लाख रुपये
- प्रसादालयात देणगी - 6 लाख रुपये
या शिवाय गेल्या महिनाभरात अनेकानी व्हीआयपी दर्शन पासच्या माध्यमातून तब्बल एक कोटी रुपये संस्थानला दान स्वरुपात मिळाले.
गेल्या महिनाभरात साई संस्थानच्या दानपेटीत 1 हजार रुपयांच्या 17 हजार 374 नोटा, 500 रुपयांच्या 39 हजार 472 नोटा मिळाल्या आहेत, तर नवीन चलनात आलेल्या 2000 रुपयांच्या 5 हजार 283 नोटांचाही दानात समावेश आहे.