मुंबई : विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानंतर (Rahul Narwekar) कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचं कारण नाही, या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ठाकरेंना टोला दिला आहे तर सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले. आमदार अपात्रता प्रकरणी आलेल्या निकालानंतर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 


देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन करण्यात आले होते.  त्यामुळेच हे सरकार मजबूत आणि भक्कम आहे, असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. त्यामुळेच  सर्वोच्च  न्यायालयाने सुद्धा आपल्या आदेशात म्हटले आहे. सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले होते.


सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचं कारण नाही : देवेंद्र फडणवीस 


 काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होते. आज विधानसभा अध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला घेत, जो आदेश आज दिला. त्यानंतर आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही. मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिला. 






ठाकरे प्रायव्हेट कंपनीप्रमाणे पक्ष चालवत होते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


आमदार अपात्रतेच्या निकालाचं स्वागत करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. हा निकाल लोकशाहीचा विजय असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. तर ठाकरे प्रायव्हेट कंपनीप्रमाणे पक्ष चालवत होते असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला आहे.  


हुकुमशाहीनं पक्ष चालवणाऱ्यांना  मोठा झटका: मुख्यमंत्री


सत्तेत आल्यापासून कायम  एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार असे सारखे बोलत होते. परंतु अजूनही मी सत्तेत कायम आहे. हुकुमशाहीनं पक्ष चालवणाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा झटका मिळाला आहे.  हा लोकशाहीचा विजय आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेचा विजय आहे.  आजचा जो निर्णय झालेला आहे तो प्रत्येक ठिकाणी एक माइल स्टोन ठरणार आहे. हा निर्णय जनतेच्या दृष्टीने खूप योग्य आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.  



हे ही वाचा :


हुकुमशाहीनं पक्ष चालवणाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा फटका, मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा