Devendra Fadnavis : मागील बराच दिवस महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात आज एक मोठी घोषणा झाली असून शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी भाजपसोबत मिळून सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा केली. स्वत:  देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. तसंच मंत्रीमंडळात स्वत: कोणतच पद घेणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. पण भाजपकडून फडणवीस यांनी सरकारमध्ये असावं आणि उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी ही मागणी केली आहे.


काय म्हणाले नड्डा?


जेपी नड्डा यांनी बोलताना सर्वात आधी नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील सरकारचे अभिनंदन केलं. तसंच यावेळी भाजप सत्तेसाठी नाही तर विचारांसाठी लढतो असं म्हणत महाराष्ट्रातील जनतेचं भलं करणं हाच आमचा उद्देश असल्याचंही ते म्हटले. तसंच एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजप पूर्णपणे उभी असणार आहे, पण या भाजपच्या केंद्रीय टीमने देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहावं त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळावी, असं ठरवलं असल्याचं महत्त्वाचं वक्तव्य नड्डा यांनी यावेळी केलं.


'फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला'


संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली, फडणवीसांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला, त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.



 देखील वाचा -