मुंबई :  मुंबईतल्या बीकेसीत आज शिवसेनेची जाहीर सभा झाली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी  देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांचा समाचार घेतला. आजच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवरही शरसंधान साधलं. बाबरी पाडायला आपण उपस्थित होतो असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं, त्यावर ठाकरेंनी टीका केली. त्यावर आज फडणवीसांनी "जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा..." म्हणत पलटवार केला आहे.


देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, "सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत,  सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम...अरे छट हा तर निघाला...आणखी एक  'टोमणे बॉम्ब'... जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा". 


काय म्हणाले उद्धव ठाकरे?


 देवेंद्रजी, बाबरी पाडली तेंव्हा तुमच वय काय होतं? ती काय शाळेची पिकनिक होती? आज मी तुम्हांला विचारतो, तुम्हीं हिंदुत्वासाठी काय केलतं? तुम्ही बाबरी पाडायला गेला नव्हता. देवेंद्र जर बाबरी पडण्यासाठी तुम्ही गेला असता तर  तुमच्या वजनाने बाबरी पडली असती  






उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा विसर  : चंद्रकांत पाटील 


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी मुंबईतील सभेत भाषण करताना राज्याच्या विकासाच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचे विसरले. स्वतः पेट्रोल डिझेलची महागाई कमी करण्याची जबाबदारी विसरले. दाऊदच्या टोळीशी व्यवहार करणाऱ्याला आपण मंत्रिमंडळात ठेवले आहे, हे सुद्धा विसरले. त्यांना मुख्यमंत्रीपदाचाच विसर पडल्याचे दिसले, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.


उद्धव ठाकरेंनी देशाचे नेतृत्व करावे : अतुल भातखळकर


उद्धव ठाकरेंनी खरोखर देशाचे नेतृत्व करावे, म्हणजे त्यांचे टोमणे ऐकण्याचे भाग्य देशवासियांना लाभेल. क्वचित प्रसंगी पुतीन आणि बायडन यांनाही टोमणे सुखाचा लाभ घेता येईल, अशी टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.


संबंधित बातम्या :


Uddhav Thackeray speech : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे


Uddhav Thackeray: राज ठाकरे म्हणजे केमिकल लोचाची केस; उद्धव ठाकरेंची टीका


भाजपचं हिंदुत्व खोटं, म्हणून सोडलं; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली