Raju Shetti on Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (5 ऑक्टोबर) लोणीमधील शेतकरी मेळाव्यातून राज्यामध्ये काटामारी करणाऱ्या साखर कारखानदारांची मी यादी केली असून त्यांना लवकरच दाखवतो असा गर्भित इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीस (Raju Shetti on Devendra Fadnavis) यांना प्रतिआव्हान देत कारवाई करणारच आहात तर, काटामारी करणारे शोधून काढलाच आहात तर तुमचे जे दाखवायचं ते एकदा दाखवा पण ती यादी तेवढी लवकर जाहीर करा, असं आव्हान दिलं आहे.
अमित शाह यांच्यात देखील धमक नाही (Raju Shetti on Amit Shah Sugar Factory Scam)
राजू शेट्टी यांनी देवेंद्र फडणीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेत हल्लाबोल केला. राजू शेट्टी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की काटा मारणारे व रिकव्हरी चोरणारे सोबत घेऊन फिरत आहात. तुम्हीच काय तुम्ही ज्यांच्यासोबत मंचावरून हे वक्तव्य केलं त्या तुमच्या पक्षाच्या पोलादी पुरूष समजल्या जाणाऱ्या अमित शाह यांच्यात देखील काटामारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची धमक नाही. तरीही काटा मारणारे शोधूनच काढला आहात, तर तुमच जे दाखवायचं आहे ते एकदा दाखवा पण ती यादी तेवढी लवकर जाहीर करा, असे आव्हान दिलं आहे.
कारखान्याचे मालक आमचा शेतकरी (Sugarcane Farmers Maharashtra)
दरम्यान, काल झालेल्या मेळाव्यात फडणवीस म्हणाले होते की, अरे तुम्ही मालक नाही या कारखान्याचे मालक आमचा शेतकरी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याचं काम सरकार करेल. साखर कारखान्यांनी नफ्यातून शेतकऱ्यांसाठी मदत निधी बाजूला काढण्यास नकार दिल्याबद्दल ते म्हणाले की, बाजूला ठेवण्यास सांगितलेला निधी हा कारखान्याच्या नफ्यातून मागितला होता, तो शेतकऱ्यांच्या एफआरपीतून नव्हे. एफआरपीतले पैसे हे शेतकऱ्याचे आहेत, नफ्यातले पैसे कारखान्याचे आहेत, असे त्यांनी सांगितले.
काटा मारून कारखानदार पैसे कमवतात (Devendra Fadnavis on Sugar Factory Scam)
फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांचा काटा मारून (वजनामध्ये फसवणूक) कारखाने पैसे जमा करतात, पण शेतकऱ्याला मदत करायला त्यांच्यात दानत नाही. तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून पैसा जमा करता आणि शेतकऱ्यांसाठी 25 लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला देण्याची दानत नाही, जे लोक आमच्यावर टीका करत आहेत, त्यांना सांगतो एकदा आरशात बघून घ्या. तुम्ही असताना तुम्ही काय केलं हे एकदा आरशात बघा त्याच्यानंतर आमच्यावर टीका करा. आम्हाला खुर्च्या तोडण्यासाठी लोकांनी पाठवलेलं नाही, शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी पाठवला आहे आणि ते केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या