Devendra Fadnavis : कायद्याच्या चौकटीत राहून भाषणं केली पाहिजेत. भाषण करताना कायदा मोडला तर कायदा आपलं काम करेल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) पार्श्वभूमीवर दिला आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था नीट राखली जाईल. दोन्ही मेळावे हे शांततेत पार पाडले जातील यासाठी बंदोबस्त ठेवण्यात येईल असेही फडणवीस यावेळी म्हणाले. दोन्हीकडील कार्यकर्ते देखील कायदा सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठी प्रयत्न करतील असे फडणवीसांनी यावेळी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार
सध्या परिस्थितीत काही घटक महाराष्ट्राला अस्थिर करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांनी या गर्दीचा फायदा घेऊ नये, याकडे आमचे विशेष लक्ष असेल असं फडणवीस यावेळी म्हणाले. दरम्यान, कायद्याच्या पलीकडं जाणून कोणी बोललं तर कायदा आपलं काम करेन. राजकारणात एकमेकांवर टीका टिपण्णी होत असते. पण हे कायद्याच्या चौकटीत राहून करावं असेही फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही कोणता दसरा मेळावा अटेन्ट करण्यास इच्छूक आहात असा प्रश्न विचारण्यात आला, यावेळी ते म्हणाले की, मी नागपूरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.
नाना पटोलेंच्या वक्तव्याला मी महत्व देत नाही
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना चित्ते भारतात कोठून आणले आहेत, याबद्दलची माहिती नाही. त्यांनी दुसऱ्याच ठिकाणचे नाव सांगितले आहे. पहिलं त्यांनी माहिती घ्यावी की कोठून चित्ते आणले आहेत. नाना पटोले चुकीची वक्तव्य करत असतात, असेही फडणवीस म्हणाले. नाना पटोले हे चर्चेत राहण्यासाठी अशी विविध प्रकारची वक्तव्य करत आहेत. काहीतरी उलट सुलट बोललं की दिवसभर चालते. मग त्याच्यावर कोणीतरी प्रतिक्रिया देते. त्यामुळं नाना पटोलेंच्या वक्तव्याला मी महत्व देत नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
का म्हणाले होते नाना पटोले
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतात आणलेल्या चित्त्यांची सर्वत्र चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडं लम्पी आजाराचा प्रादुर्भावही वाढत आहे. दरम्यान यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे. लम्पी रोग नायजेरिया मधून आला आहे. नरेंद्र मोदींनी वाढदिवशी आणलेला चित्ताही नायजेरिया मधून आणला आहे. चित्त्यावरील ठिपके आणि लम्पी मधील ठिपके सारखे आहे. हा एक कट असून विदेशातील आजार देशात आणला आहे. हे शेतकऱ्यांच्या विरोधातला कट असल्याचे पटोले म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या: