दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 11 वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. त्यामध्ये वसंतरावांनी पाच वर्षांची एक सलग टर्म पूर्ण केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच 5 सलग वर्ष विधिमंडळाचे नेते राहू शकले आहेत. फडणवीस हे राज्याचे पहिले भाजप मुख्यमंत्रीदेखील आहेत.
मुख्यमंत्री होणे आणि पद टिकवण्यासाठी फडणवीसांना मोठा संघर्ष करावा लागला आहे. मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर फडणवीसांना पक्षातील आणि पक्षाबाहेरची मोठी आव्हाने होती. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी काही आमदारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर फडणवीसांना पक्षातील जुने नेते एकनाथ खडसे यांची महत्त्वकांक्षा, शेतकरी आंदोलनाची तीव्रता, मराठा आंदोलनाचे आवाहन, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा ते पंढरपूरच्या विठ्ठल पूजेला जाऊ न शकणे इथपर्यंत बरीच आव्हाने पेलावी लागली होती. तरिही फडणवीस टिकले.
महाराष्ट्राचे मुख्यमत्रीपद आणि मुख्यमंत्र्यांबाबत इंटरेस्टिंग माहिती
1. बॉम्बे स्टेटचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे नवीन राज्य झालेल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (1 मे 1960)
2. मुख्यमंत्रीपदी असताना मारोतराव कन्नमवार यांचे निधन झाले.
3. वसंतराव नाईक हे सर्वात जास्त काळ (11 वर्षे) मुख्यमंत्रीपदी राहिले.
4. पी. के. सावंत हे सर्वात कमी काळ (अवखे 10 दिवस) मुख्यमंत्रीपदी राहिले.
5. शरद पवार हे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरेल आहेत.
6. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तीनवेळा विराजमान होणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणजे शरद पवार. शरद पवार तीन वेळा मुख्यमंत्री झाले परंतु एकदाही मुख्यमंत्रीपदाची 5 वर्षाची टर्म पूर्ण करु शकले नाहीत.
7. शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण हे दोघे पितापुत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.
व्हिडीओ पाहा