Sujay Vikhe Patil :  आज देशभर गुरुपौर्णिमेचा (guru purnima) उत्सव सुरु आहे. अनेकजण गुरुपौर्णिमेच्या दिवशी देव दर्शनाला जातात.  साईबाबांच्या शिर्डीत देखील गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्ताने मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. साई भक्तांबरोबरच सेलिब्रिटी असो किंवा राजकारणी देखील नतमस्तक झाले. माजी खासदार व भाजप नेते सुजय विखे यांनी देखील आपल्या पत्नी आणि मुलासह साई समाधीचे दर्शन घेतलं. माझ्या नवयुगातील राजकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच माझे गुरु असल्याचे विखे पाटील म्हणाले. 

Continues below advertisement


यशस्वी खासदार जरी नसलो तरी यशस्वी राजकारणी आहे


साईबाबांच्या दर्शनानंतर सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना  सुजय विखे पाटील यांनी मी यशस्वी खासदार जरी नसलो तर यशस्वी राजकारणी असल्याचं सांगितलं. माझ्या या नवयुगातील राजकारणातील फडणवीस हेच गुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. आजोबा स्वर्गीय बाळासाहेब विखे हे नेहमीच गुरु राहिले. मात्र माझ्या राजकारणातील प्रवासात आजचे गुरु फडणवीस आहेत, हे सांगत त्यांनी सर्वांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.


बीडमध्ये अनोख्या पद्धतीनं गुरु पौर्णिमा साजरी


देशभरात गुरु पौर्णिमेचा उत्साह असून आपल्या गुरुंप्रती आदर, सेवाभाव आणि गुरुजनांना वंदन करुन कृतज्ञता व्यक्त होत आहे. शाळा, कॉलेज आणि विविध संस्थांमध्ये गुरुंच्या आठवणी, त्यांनी दिलेलं ज्ञान आणि शिकवण सांगत गुरु पौर्णिमा साजरी केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या वृत्तांनी काळ्या यादीत गेलेल्या बीडमधील (Beed) गुरुकूल शिक्षण संस्थेतील गुरु पौर्णिमा निश्चितच काहीशी वेगळी ठरते. बीडमध्ये आदर्श भावी पिढी घडविताना विद्यार्थ्यांमध्ये संस्काराची लागवडच येथील संस्थेनं केली आहे. बीडच्या सोनदरा गुरुकुलमध्ये (school) आज अनोखी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. श्री सत्यवृक्ष पूजन आणि एक वर्ष पूर्ण झालेल्या झाडांचा वाढदिवस करून निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांची गुरुपौर्णिमा साजरी झाली. शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा वेगळाच उत्साह या निमित्ताने दिसून आला. पाटोदा तालुक्यातील डोमरी गावातल्या डोंगर रांगेत मागील 40 वर्षांपासून हे गुरुकूल वसलेले आहे. गुरु पौर्णिमा आणि गुरुकुलचा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला. याच निमित्ताने यावर्षी सत्यनारायण पूजेच्या धरतीवर श्री सत्यवृक्ष पूजा करण्यात आली. त्यात आयुर्वेदातील मंत्र कथा आणि पूजेची मांडणी करून एक वर्ष जोपासलेल्या झाडांचा वाढदिवस देखील साजरा झाला


महत्वाच्या बातम्या:


बीडमधील 'आदर्श'वत गुरुपौर्णिमा; निसर्गाच्या कुशीत झाडांच्या वाढदिवसासह विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांची लागवड