Devendra Fadanvis on Abhishek Ghosalkar Firing Case : गेल्या आठवड्यात आमदार गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad) यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. हे प्रकरण शांत होते ना होते तोच शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक (Shiv Sena UBT) अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या (Abhishek Ghosalkar Firing Case) करण्यात आली. यावरुन विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. संजय राऊत, सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे.
घोसाळकर गोळीबारप्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी गोळीबार झाला. ही घटना अतिशय दुःखद आहे. एका तरुण नेत्याचे असे निधन होणे गंभीर आहे. ज्यांनी गोळ्या घातल्या ते मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर एकत्र होते. पण त्यांचा नेमका काय वाद झाला आणि असे कृत्य का घडलं? याची पोलीस चौकशी करत आहेत, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात पोलीस चौकशी करत आहेत. या हल्ल्यामागे वेगवेगळी कारणे आहे. पण काही लोक राजकारण करत आहेत. या घटनेचे राजकारण योग्य नाही. या घटनेमुळे कायदा सुव्यवस्था बीघडली हे म्हणणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील -
घोसाळकर आणि मॉरिस काही वर्षे एकत्र काम करत होते. आपापसातील वादातून हा प्रकार घडल्याचं समोर आले आहे. माझ्यावर पूर्णपणे राजकीय आरोप आहेत.एखाद्या गाडी खाली एकदा श्वान आला तर ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील, असा टोला विरोधकरांना फडणवीसांनी लगावला. विरोधीपक्षाचे काम विरोधीपक्ष करतोय. पण या घटनेचे कुणी राजकारण करू नये, असा सल्लाही यावेळी फडणवीसांनी दिला.
बंदुकीच्या लायसन्सवर काय म्हणाले फडणवीस ?
बंदुकाना लायसन्स देणे योग्य आहे का? लायन्सन कोणी दिले..येत्या काळात बंदुकाचे लायसन्स द्यायचे का? याचा विचारही राज्य सरकार करत आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आणखी वाचा :
Who Is Abhishek Ghosalkar: ठाकरेंचे कट्टर समर्थक, मॉरिसभाई सोबत राजकीय वैर, कोण होते अभिषेक घोसाळकर?
Morris Noronha: बलात्काराच्या आरोपात जेल, थंड डोक्यानं गोळीबार, कोण आहे मॉरिस भाई?