मॉस्को : महाराष्ट्र सरकार आणि रशियामध्ये महत्त्वपूर्ण करार झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या रशियाच्या दौऱ्यावर असून आज मुख्यमंत्री आणि सेंट पीटर्सबर्गचे गव्हर्नर जॉर्जी पोल्तॉवचेंको यांनी पाणीपुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया विषयक सामंजस्य
करारावर स्वाक्षरी केलीय.


 
या करारानुसार सेंट पीटर्सबर्गकडून महाराष्ट्राला तांत्रिक आणि इतर धोरणात्मक स्वरुपाचे सहकार्य महाराष्ट्राला मिळणार आहे. त्याचबरोबर मुंबईतल्या मिठी नदीसह इतर नद्याच्या शुद्धीकरणासाठी वोडोकॅनोल संस्थेची मदत घेतली जाणार आहे.

 
या करारासोबतच नगरविकास, स्मार्टसिटीची उभारणी, जहाजबांधणी, माहिती तंत्रज्ञान, उच्चशिक्षणाबाबतही सेंट पीटर्सबर्गकडून महाराष्ट्राला सहकार्य मिळेल.

 

 

https://twitter.com/CMOMaharashtra/status/752922984965283840