पंढरपूर : कोरोनाच्या महासंकटामुळे यंदा आषाढी यात्रा होणार का हा सर्वात मोठा प्रश्न सध्या वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. त्यासंदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रशासन आणि पालखी सोहळ्याचे मानकरी यांच्यासोबत दुपारी चार वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे बैठक घेणार आहेत. राज्यातील हा सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाला कोरोनामुळे ब्रेक लागण्याची शक्यता आहे. परंतु वारकरी संप्रदायाने परंपरा खंडित न करण्याची भूमिका घेतल्याने पेच निर्माण झाला आहे.


या यात्रेला सात संतांच्या प्रमुख मानाचे पालखी सोहळे हजारो भविकांसह पायी पंढरपूरला येत असतात. याशिवाय इतर 150 पालखी सोहळे राज्य आणि शेजारच्या राज्यातून पायी चालत येत असतात. सर्वात मोठे असलेले संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम पालखी सोहळे पुणे आणि पिंपरी चिंचवड या रेड झोनमधून येतात तर निवृत्तीनाथांची पालखी त्रिंबकेश्वर, सोपानदेव यांची सासवड, नाथ महारकांची पैठण तर मुक्ताईची मुक्ताईनगरमधून म्हणजेच रेड झोनमधून येते.


आषाढीची परंपरा अखंडित राहणार, बैठकीत एकमत, पालखी सोहळ्याबाबत सरकारशी चर्चा करणार


सोलापूर जिल्हाही रेड झोनमध्ये असून जवळपास 330 कोरोना रुग्ण येथे आहेत. अशावेळी आषाढी यात्रेला परवानगी दिल्यास कोरोना व्हायरसच्या फैलावाची भीती सध्या पंढरपूरकर नागरिक आणि प्रशासनाला भेडसावत आहे. आता परंपरा जपण्यासाठी राज्याला वेठीला धरणे योग्य नसल्याची भूमिका वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी मांडत आहेत. त्यामुळे आज अजित पवार यांना याबाबतच निर्णय घ्यायचा असल्याने आषाढीचे भवितव्य या बैठकीवर अवलंबून आहे.


'आषाढी'वर शिक्कामोर्तब, यंदा असा होऊ शकतो आषाढीचा पालखी सोहळा


आषाढी पालखी सोहळ्याची परंपरा अखंडित ठेवण्यावर विश्वस्तांच्या बैठकीत एकमत