Eknath Shinde: महाराष्ट्रात नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. सर्वच राजकीय पक्षातील प्रमुख नेते राज्यभर जाहीर सभा घेत निवडणुकीचा प्रचार करत आहेत. शिवसेना शिंदे गटाने देखील प्रचारामध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. या प्रचार दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची नवीन स्टाईल पाहायला मिळाली. ज्या शहरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा असते, एकनाथ शिंदे तिथल्या समस्या जाणून घेतात आणि भाषणादरम्यानच थेट संबंधित मंत्र्याला फोन लावतात. तातडीने प्रश्न सोडवण्याची सूचना भाषणादरम्यानच करतात. यावेळी एकनाथ शिंदे संबंधित मंत्र्याचा फोन लावून स्पीकरवर ठेवून सभेसाठी उपस्थित असणाऱ्या नागरिकांना मंत्र्यांचे आश्वासन ऐकवतात.
पांढरकवडा तालुक्यामध्ये एमआयडीसीची गरज अन्..
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यामध्ये एमआयडीसीची गरज आहे... उपस्थित नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एमआयडीसीची मागणी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तातडीने उद्योग मंत्री उदय सामंत यांना फोन लावला. फोन लावून स्पीकरवर ठेवून उद्योग मंत्री उदय सामंत यांना एमआयडीसी बाबत सूचना दिल्या. त्यावेळी उद्योग मंत्री सामंत यांनी देखील लाऊड स्पीकर वरूनच उपस्थित त्यांना यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात एमआयडीसी देण्याबाबत आश्वासन दिले. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणादरम्यान फोन लावला. संगमनेर येथील 100 बेडस हॉस्पिटल पुन्हा सुरू करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. अनेक वर्षांपासून संगमनेर येथील शासकीय रुग्णालय बंद अवस्थेत आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांची गैरसोय होते... यामुळेच एकनाथ शिंदे यांनी आरोग्यमंत्र्यांना फोन लावून उपस्थित त्यांना आश्वासन दिले.
वनी इथल्या भाषणादरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते सिद्धेश कदम यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन लावला वनी इथल्या प्रदूषणाबाबत तातडीने कारवाई करण्याची सूचना कदम यांना देण्यात आली. कदम यांनी देखील लाऊड स्पीकर वरून उपस्थित त्यांना प्रदूषण कमी करण्यासंदर्भातले आश्वासन दिले.
इतर महत्वाच्या बातम्या