मुंबईआगामी लोकसभा (Loksabha Election 2024) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) आज (28 फेब्रुवारी) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचा (VBA) मुद्दाच केंद्रस्थानी राहिला. वंचित बहुजन आघाडीकडून आतापर्यंत राज्यातील 48 पैकी किती मतदारसंघांमध्ये त्यांच्याकडून तयारी करण्यात आली आहे आणि कोणत्या मतदारसंघांमध्ये त्यांचं ताकद आहे हे त्यांनी या बैठकीमध्ये सांगितले. राज्यातील 27 जागांवर वंचितने आपली ताकद असल्याचे महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सांगितल्यानंतर भूवया उंचावल्या गेल्या. त्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचा गुंता अजूनही सुटला आहे की नाही? अशी चर्चा रंगली. बैठक पार पडल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मात्र याबाबत स्पष्टता देण्यात आली.


वंचित बहुजन आघाडीसह जागावाटप पार पडले


शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत बोलताना वंचित आघाडीकडून आलेल्या प्रस्तावावर बोलताना स्पष्ट शब्दांमध्ये भाष्य करताना यापुढे बैठका होणार नसल्याचे सांगितले. त्यांनी वंचित बहुजन आघाडीसह जागावाटप पार पडल्याचा मोठा दावा केला. महाविकास आघाडीकडून कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? हा मुद्दा मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगितला नसला, तरी जागावाटप पूर्ण झाल्याचे ते म्हणाले. संजय राऊत यांनी सांगितले की, आता एकच बैठक होईल ज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार असतील आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये जागावाटप सांगितले जाईल. त्यामुळे महाविकास आघाडीचा गुंता सुटला आहे की तो आता पडद्यामागे राहूनच पूर्ण केला जाईल याची सुद्धा चर्चा रंगली आहे. 


जरांगेंच्या प्रस्तावावर काय म्हणाले?  


या संदर्भामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचं मार्गदर्शन होत असल्याचे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, वंचित आघाडीकडून जालन्यामधून मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी द्यावी असं सुद्धा प्रस्तावात म्हटला होतं. मात्र, आमच्याकडे तसा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे बैठका होणार नाही, वंचित बहुजन आघाडीसह जागावाटप पार पडल्याचे ते म्हणाले. 


संजय राऊत पुढे म्हणाले की, आजच्या बैठकीसाठी तिन्ही पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते. वंचितकडून जो प्रस्ताव आला तो मोठा वाटत असला तरी तसं नाही. त्यांनी ज्या पद्धतीने तयारी केली आहे ते त्यांनी सांगितले. आम्ही प्रत्येक जागेवर बैठकीमध्ये चर्चा केली. या संदर्भातील वाद अजिबात नाही, तसेच आम्ही तीन पक्ष नव्हे तर आम्ही चार पक्ष मानतो. ते म्हणाले की, वंचित हा मविआचा महत्त्वाचा घटक आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या