ठाणे : ठाण्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत जात आहे. गेल्या काही दिवसात 7 रुग्णांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला, तर 133 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील डॉक्टरांची टीम ठाण्यात आली होती.


दिल्लीवरुन मुंबई आणि पुण्यासाठी केंद्रीय डॉक्टरांची एक टीम आली होती. या टीमने ठाणे जिल्ह्यातही रुग्णालयांना भेटी दिल्या.

ठाण्यात गेल्या काही दिवसात 7 रुग्णांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. त्याच सोबत 133 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्यामुळे शासकीय आणि खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी काय सुविधा करण्यात आल्या आहेत, हे तपासण्यासाठी दिल्लीहून डॉक्टरांची टीम आली होती.

चार डॉक्टरांच्या या टीमने ठाण्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये भेटी दिल्या आणि आवश्यक त्या उपयोजना करण्यास सांगितल्या. तसेच या भेटींचा विस्तृत अहवाल देखील ते केंद्रात सादर करणार असल्याचे टीममधील डॉक्टरांनी सांगितले.

केंद्रीय डॉक्टरांच्या या भेटींच्या आधी ठाण्यातील जिल्हा, ग्रामीण आणि शहरी भागातील शासकीय डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत दिल्लीच्या टीमने मिटिंग देखील घेतली.