Parbhani Loksabha Election News : बाहेरचा उमेदवार दिल्याने परभणीत लोकसभा मतदारसंघात (Parbhani Loksabha Election) पराभव झाल्याचे वक्तव्य भाजपाचे पक्ष निरीक्षक आमदार राम पाटील रातोळीकर (Ram Patil Ratolikar) यांनी केलं आहे. परभणी लोकसभा मतदारसंघच, नाहीतर राज्यभरातील जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याची कारणमीमांसा करण्यासाठी भाजपकडून प्रत्येक जिल्ह्यात विचार मंथन केले जात आहे. त्या अनुषंगाने परभणीतही जो पराभव झाला, त्याचे विचार मंथन कार्यकर्त्यांकडून जाणून घेत आहे. इथं बाहेरचा उमेदवार दिल्यानेच तसेच इतर चार पाच कारणामुळे पराभव झाल्याची कबुली आमदार राम पाटील रातोळीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.


पक्ष निरीक्षक म्हणून प्रत्येक जिल्ह्यात भाजपकडून पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने राम पाटील यांनी परभणीतील कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. पराभवाची कारण सांगत असताना ते म्हणाले की, बाहेरचा उमेदवार दिल्याने येथे पराभव झाला आहे. 


परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव विजयी


परभणी लोकसभा मतदारसंघ . या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव विजयी झाले आहे. त्यांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यासह वंचितचे उमेदवार हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा पराभव केलाय. या मतदारसंघात 34 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. यामध्ये पंजाबराव डखांसह (Panjabrao Dakh) 31 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं आहे. दरम्यान, बाहेरचा उमेदवार दिल्यानच परभणी लोकसभा मतदारसंघात पराभव झाला असल्याचे आमदार राम पाटील म्हणाले. 


परभणी लोकसभा मतदारसंघात कोणाला किती मते मिळाली?


परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव यांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये संजय जाधव यांनी मोठ्या मतांनी विजय मिळवला आहे. संजय जाधव यांना 6 लाख 1 हजार 343 एवढं मताधिक्य मिळालं आहे. त्या पाठोपाठ पराभूत झालेले उमेदवार महादेव जानकर यांना 4 लाख 67 हजार 282 एवढे मताधिक्य मिळालं तर तिसऱ्या नंबर वर वंचित चे उमेदवार हवामान तज्ञ पंजाब डख यांना 95 हजार 967 एवढ मतदान मिळाले. परभणी लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. एकूण 34 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, या निवडणुकीत परभणीतील मतदारांनी संजय जाधव आणि महादेव जानकर यांचे डिपॉझिट सुरक्षित ठेवले आहे. 


महत्वाच्या बातम्या:


हवामानाचा अचूक अंदाज सांगणाऱ्या पंजाबरावांना राजकारणाचा अंदाज आला नाही, डखांना किती मिळाली मते?