अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या हरीसाल येथील महिला वन अधिकारी दीपाली चव्हाण  यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली.  दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी DFO विनोद शिवकुमार यांना 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश धारणी न्यायालयाने दिले आहेत. यावेळी DFO विनोद शिवकुमारांविरोधात धारणी पोलीस स्टेशनमध्ये तसेच न्यायालयाच्या आवारात महिलांचा जन आक्रोश पाहायला मिळाला.


Deepali Chavan suicide case : आत्महत्या करण्याआधी दीपाली चव्हाण यांचं पतीला भावनिक पत्र


धारणी न्यायालयासमोरच शिवकुमार यांचा फोटो जाळून तीव्र निषेध करण्यात आला.  DFO शिवकुमारला फाशी द्या, शिवकुमार मुर्दाबाद, PCCF रेड्डीला सह आरोपी करा अशी यावेळी मागणी केली.  शिवकुमार यांना धारणी पोलिसांनी न्यायालयात पोलीस व्हॅनमधे न नेता पायी न्या अशी मागणी देखील यावेळी महिलांनी यावेळी केली.


आत्महत्या करण्यापूर्वी सिंघम लेडी दीपाली चव्हाण यांनी आपल्या तक्रार अर्जात काय लिहलं होतं?


यावेळी बोलताना वनपरिक्षेत्र महिला अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. दीपाली चव्हाण या खूप खंबीर होत्या हिमतीच्या मात्र त्यांना खूप त्रास दिला गेला. शिवकुमार यांना सेवेतून बडतर्फ करावं. रेड्डी साहेब देखील याला जबाबदार आहेत. त्यांनी दीपाली यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे. शासनाला विनंती आहे की, शिवकुमारला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी वनपरिक्षेत्र महिला अधिकाऱ्यांनी यावेळी केली.


दीपाली चव्हाण आणि डीएफओ शिवकुमार यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल


लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या दीपाली चव्हाण आणि डीएफओ विनोद शिवकुमार यांच्यामध्ये फोन वरून जो वार्तालाप झाला त्याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामध्ये शिवकुमार आपल्याच वनविभागाच्या महिला अधिकाऱ्यांसोबत कसे एकेरी भाषेत बोलतात ते स्पष्ट होत आहे. शिवाय या क्लिपमध्ये शिवकुमार हे बोलताना मान मर्यादा आणि महिलांशी कसं बोलायचं याचं सुद्धा भान नाही. आपली ज्यूनियर अधिकारी आहे म्हणून कसेही बोलायचं पातळी सोडून बोलायचं आणि यामध्ये दीपाली चव्हाण या महिला अधिकाऱ्यांनी जे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे, त्याचं संपूर्ण संभाषण या ऑडिओ क्लिप मध्ये आहे. शिवाय या क्लिपमध्ये दोघांच्या संवादात खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा यांचा देखील उल्लेख आहे. संपूर्ण कॉलमध्ये दीपाली चव्हाण या अत्यंत नम्र भाषेत बोलताना दिसत आहेत  तर शिवकुमार मात्र अत्यंत उर्मट भाषेत बोलत आहेत. 


Deepali Chavan यांना मदत करता न आल्याची सल; खासदार नवनीत राणा यांना अश्रू अनावर


दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्ये शिवकुमार यांच्यावर आरोप
दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्ये माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार हे गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हेच असतील, त्यांच्यावर कारवाई करा असं लिहिलं आहे. माझ्यासोबत जे झाले ते इतरांसोबत होऊ नये असे आत्महत्या केलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्त्येपूर्वी केलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहलं आहे. वनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे दिपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.  ही सुसाईड नोट अर्थात चव्हाण यांनी  अपर प्र.भु.व. संरक्षक क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांच्या नावे केला आहे. दीपाली चव्हाण यांनी लिहलेल्या चार पानांच्या या पत्रात त्यांनी आपण का आत्महत्या करत आहोत याबाबत सविस्तर लिहून दिलं आहे.