Deepak Kesarkar On Udhhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज औरंगाबाद दौरा केला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. यावर बोलताना मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरेंवर थेट टीका केली आहे. केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी किती लोकांना त्यांनी 50 हजार रुपये नुकसान भरपाई दिली हे जाहीर करावं. तुम्ही जेवढे दिले त्याच्या दुप्पट आम्ही कमी वेळात पैसे शेतकऱ्यांना दिले. तुम्ही फक्त बोलता आम्ही करून दाखवतो अशी टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी थेट उद्धव ठाकरेंवर केली आहे. निर्दयी सरकार कसं असतं हे यापूर्वीच्या सरकारकडे बघून लोकांना समजलं आहे. आयुष्यात यांनी कधीही पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना थेट दिले नाहीत, असंही केसरकर म्हणाले.
केसरकर म्हणाले की, दगडाला पाझर फुटत नव्हता म्हणूनच 50 आमदार फुटले का? दगडाला त्यावेळी पाझर फुटला असता तर सध्या भेटी जरी दिल्या असत्या, लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली असती, लोकांना न्याय दिला असता, तर पक्षांमध्ये बंड का झालं असतं? मग पाझर कोणाला फुटत नाही. 20 आमदार येऊन हे सगळं एकत्र मिटवूया म्हणून सांगत होते, यावेळी कोण सांगत होतं, तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत निघून जा. त्यावेळी पाझर का फुटला नाही? बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना कुठेतरी अडचणीत येणार हे माहिती असताना सुध्दा तुम्ही निघून जा म्हणणं, याला काय म्हणायचं. हा निर्दयीपणा नाही का? याची थेट टीका केसरकरांनी केली आहे.
लोकांमध्ये जाऊन लोकांना भडकवून केव्हा सरकार चालत नसतात, ज्यांना शेतकऱ्यांची आठवण अडीच वर्षांपूर्वी झाली नाही. हे घरातून बाहेर पडले नाहीत त्यांनी आमच्यावर टीका करणे योग्य नाही. आनंदाच्या शिधाच्या माध्यमातून दिवाळीचा शिधा प्रत्येकाच्या घरी गेला अडीच वर्षाच्या काळात तुम्हाला ते का जमलं नाही. अडीच वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या दारावर कधी जाऊ शकले नाहीत. मात्र आज शेतकऱ्यांच्या दारावर गेले याचा मला आनंद आहे. आम्ही उठाव केल्यानंतर यांना शेतकऱ्यांची आठवण झाली. ही खूप मोठी गोष्ट आहे. उद्धव ठाकरे यांना आज शेतकऱ्यांकडे जाण्याची संधी मिळाली ती सुद्धा आमच्यामुळेच मिळाली, असा थेट हल्लाबोल दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
केसरकर म्हणाले की, आम्ही जर असे शांत राहिलो असतो तर लोकांना कधी ते बघायला मिळाले नसते. लोकांनी त्यांना केवळ टीव्हीवर पाहिलं असतं. कायम व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांची वार्ता लोकांना टीव्हीवरनं पाहायला मिळाली असती मात्र आमच्यामुळे लोकांना ते थेट शेताच्या बांधावर जाताना भेटायला मिळतात.
केसरकर म्हणाले की, जिथे लोकप्रतिनिधींना एन्ट्री मिळत नव्हती. तिथे सर्वसामान्यांची काय स्थिती असणार मी तासंतास वर्षाच्या बाहेर हे मुख्यमंत्री असताना वाट पाहिलेली आहे मात्र केव्हाही सिल्वर मला वाट पाहायला मिळाली लागली नाही त्यामुळे आम्ही जे बंड केले ते सर्वसामान्य माणसासाठी केलेला बंडा आहे अवकाळी पावसामुळे ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले त्या सर्व शेतकऱ्यांचे जलद गतीने पंचनामे करून लोकसभेवर नुकसान भरपाई देण्याचा आश्वासन यावेळी दीपक केसरकर यांनी दिलं.