Majha Katta : बॉलिवूडसाठी मला एका चित्रपटासाठी मुख्य रोलची ऑफर आली होती आणि त्यात गाणी म्हणण्याची ऑफर होती. परंतु, वडिलांना बॉलिवूडसाठी गाणं म्हणणं पसंत नाही. त्यामुळे मी ती ऑफर नाकारली, असं प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूरने सांगितलं. एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर गायिका मैथिली ठाकूरच्या  ( Maithili Thakur) सुरांची मैफल रंगली. यावेळी मैथिलीचा भाऊ वृषभ आणि तिचे वडील रमेश ठाकूर देखील उपस्थित होते. या सर्वांनीच मैथिलीच्या गाण्याचा प्रवास माझा कट्ट्यावर उलगडला. 


मैथिलीने गायलेले मराठी अभंग खूप लोकप्रिय आहेत. लोकसंगीताच्या माध्यमातून मैथिली घराघरात पोहोचली आहे. मैथिलीच्या गाण्याचे करोडो चाहते आहेत. प्राचीन लोकसंगीतांवर मैथिलीचा खूप प्रभाव आहे. परंतु, तिने बॉलिवूडसाठी गाणं म्हणणं तिच्या वडिलांना पसंत नसल्याचे ती सांगते. "आम्ही पहिल्यापासूनच अभंग गातो. त्यासाठीचा मैथिलीचा आवाज हा नैसर्गिक आहे. परंतु, बॉलिवूडकडे वळलो तर हा नैसर्गिकपणा नाहीसा होईल म्हणून तिला बॉलिवूडसाठी गाणं न गाण्याचा सल्ला देतो, असे मैथिलीच्या वडिलांनी सांगितले. 


गाणं शिकण्यासाठी मधूबनीहून (बिहार) दिल्लीला येण्याचा निर्णय घेतला. घरात सर्वांनाच गाण्याची आवड आहे. तीन-चार वर्षांची असल्यापासून मैथिली गाणं गाते असे मैथिलीच्या वडिलांनी माझा कट्ट्यावर सांगितले. 


खूप लहाण असल्यापासून हार्मोनियम वाजवण्यास सुरूवात केली. त्यानंतर गाणं शिकले.  आई-वडिलांकडूनच संगीताचं बाळकडू मिळालं, असं मैथिली सांगते. मराठी बोलता येत नाही. परंतु, जे गाणं गायचं आहे ते खूप  वेळा गाते आणि ते फरफेक्ट करते. जवळपास शंभर वेळा ते गाणं गाते. बंगाली, राजस्थानी, मराठी,  हिंदी सारख्या अनेक भाषांमध्ये मैथिली गाणे गाते. अपार मेहनतीतून मैथिलीचे सूर फुलवले आहेत. सात वर्षांची असल्यापासून गाणं शिकते. मैथिली सांगते की, तिला भजन खूप आवडते. मैथिली सध्या क्लासीकल संगीत शिकत आहे. किशोरी आमोनकर आणि पंडित भिमसेन जोशींना आदर्श मानते. तर मैथिलीच्या यशात पालकांचा मोठा वाटा असल्याचे ती सांगते.  


2017 नंतर माझे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर लोकांना माझं गाणं माहित झालं. लोकसंगीत आणि देवांची गाणी गावी असं वडिलांचं मत आहे. बॉलिवूडसाठी गाणं वडिलांना पसंत नाही. सर्वात आधी भोजपूरी भाषेमध्ये एक गाणं गायलं. हे गाणं खूप व्हायरल झालं. लोकांना ते खूपच आवडलं. मी खूप भाषेत गायलं पण मराठी मधील मी गायलेले अभंग खूप व्हायरल झाले. या अभंगांमुळे मी महाराष्ट्रातील घरा-घरात पोहोचले. मला अभंग गायला खूप आवडतं, असं मैथिली सांगते.