ED Detain Sanjay Raut : ही कारवाई त्यांच्या कडे असलेले पुराव्यावरून होत आहे, त्यामुळे त्यांचा आणि आमचा संबंध नाही, मुद्दाम असे गैरसमाज पसरवले जात आहेत. संजय शिरसाट यांचे वक्तव्य आले होते, त्यांची मागणी ती आमची मागणी नाही. तसेच. अमित शाह यांच्या भेटीशी आणि राऊत यांच्यावर होणारी कारवाई यांचा देखील संबंध नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली. 


पुनर्वसनाचे प्रकल्प जे आहेत ते गोर गरिबांना घर मिळावे यासाठी आहेत, त्यात जर घोटाळे होत असतील तर नक्कीच कारवाई होईल, असा इशाराही यावेळी दीपक केसरकर यांनी दिली. संजय राऊत हे किती वेळा सोनिया गांधी यांना भेटायला दिल्लीला गेले याची माहिती घ्या, असेही केसरकर म्हणाले.  


ज्याच्या बरोबर आपण काम करत असतो युती मध्ये असतो त्याच्या मोठ्या नेत्यांना देखील मान द्यायला पाहिजे, त्यामुळे कालची मीटिंग सुद्धा अमित शाह यांच्यासोबत होती, ते देशाचे गृहमंत्री आहेत, शिंदे हे आमचे नेते आहेत, त्यामुळे ते भेटायला गेले होते, मंत्री मंडळ विस्तारावर चर्चा करायला गेले होते, असे केसकर यांनी सांगितलं. संजय शिरसाट यांच्यासोबत इतर जे आमदार आहेत, त्यांना आम्ही सांगणार आहोत, अश्या प्रकारची वक्तव्य यापुढे होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, असे केसरकर यांनी सांगितलं. 


माझ्या मतदारसंघात उद्या आदित्य ठाकरे जाणार आहेत, मी कोणालाही सांगितले नाही, की जाऊ नका, पण उद्या जर आदित्य ठाकरे यांनी काही बोलले तर त्यानंतर परवा मी बैठक घेऊन माझ्या वरचे सर्व बंधने बाजूला होतील. एक नैतिकता ठेऊन मी आजपर्यंत बोलत होतो, मात्र आता उद्यापासून ते राहणार नाही, असा इशारा केसरकर यांनी दिला. 


सकाळपासून नेमकं काय झालं?
रविवारी सकाळी सात वाजता दादरमधील गार्डन कोर्ट इमारतीतील संजय राऊत यांच्या फ्लॅटमध्ये ईडीचे अधिकारी दाखल झाले. 




 



सकाळी 7.15 वाजता ईडीचे पथक संजय राऊत यांच्या भांडुपच्या घरी दाखल झाले. यावेळी संजय   राऊत आणि त्यांचे बंधू सुनिल राऊत घरीच होते. 


सकाळी 8.20 वाजता सुनिल राऊत खिडकीत आले. 


सकाळी 8.40 वाजता शिवसेनेचे कार्यकर्ते संजयर राऊतांच्या घराबाहेर जमले आणि राऊतांच्या समर्थनात घोषणाबाजी केली. 


सकाळी 8.46 ते 8.50 दरम्यान राऊतांचे चार ट्विट, शिवसेना सोडणार नाही, कोणत्याही घोटाळ्याशी काडीमात्र संबंध नाही, खोटी कारवाई, खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही असे चार ट्विट संजय राऊत यांकी केले.  


सकाळी नऊ वाजता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांची प्रतिक्रीया आली. राऊतांच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली, राऊतांच्या आजच अटकेची शक्यता, शिरसाठ यांची प्रतिक्रीया. 


सकाळी 9.30 वाजता संजय राऊतांच्या घरी डीसीपी प्रशांत कदम सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोहोचले. 


सकाळी 10.28 वाजता संजय राऊतांचे वकील विक्रांत साबणे पोहोचले. 


सकाळी 11.07 वाजता स्वत: संजय राऊत घराच्या खिडकीत आले आणि कार्यकर्त्यांना अभिवादन केलं. 


सकाळी 11.25 वाजता आढावा बैठकीसाठी जाताना मुख्यमंत्र्यांनी राऊतांच्या कारवाईवर पहिली प्रतिक्रीया दिली. 


दुपारी एक वाजता औरंगाबादमध्ये आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. कर नाही तर डर कशाला अशी राऊतांच्या कारवाईवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. 


दुपारी 1.30 वाजता राजन विचारे दहा बसेस भरून ठाण्यातील शिवसैनिकांना घेऊन मातोश्रीवर दाखल झाले.


दुपारी चार वाजता संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं