Maharashtra Politics : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शपथ घेतली. तर शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे हे सातत्यानं दौरे करताना दिसत आहेत. अगदी मध्यरात्रीपर्यंत काही कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली होती. याविषयी बोलताना दीपक केसरकर यांनी त्यांची स्तुती केली आहे. केसरकर यांनी म्हटलं आहे की, रात्री केवळ दोन ते तीन तास झोपणारा व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाले आहेत. त्यांचा उपयोग राज्याने करून घेतला पाहिजे, राजकारण थोडं बाजूला ठेवलं पाहिजे, असं केसरकर यांनी म्हटलं आहे. 


केसरकर म्हणाले की, पूरग्रस्त किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. ती मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. कुठंही चुकीची घटना घडणार नाही. पंचनामे करून मदत दिली जाणार असल्याचं ते म्हणाले. 
 
सरकार अतिशय स्थिर आहे, सरकारला कोणताही धोका नाही


दीपक केसरकर म्हणाले की, सरकार अतिशय स्थिर आहे, सरकारला कोणताही धोका नाही. काल छत्रपती घराण्याच्या वंशजांची भेट घेतली, त्यांच्या संकल्पना जाणून घेतल्या. अजून विभागांचे वाटप झाले नाही, कोणतं खातं मला मिळणार हे माहीत नाही.  सिंधुदुर्ग हा सगळ्यात पहिला पर्यटन जिल्हा म्हणून निर्माण झाला आहे. राज्यातील देवस्थानाचे पावित्र्य राखलं पाहिजे, भाविकांना सुविधा उपलब्ध झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे, असं ते म्हणाले. 


लवकरच मंत्रिमंडळ विस्तार


संजय शिरसाट यांच्या ट्वीटबाबत बोलताना केसरकर म्हणाले की, संजय शिरसाट यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. पहिल्या टप्प्यात संधी मिळाली नाही तरी दुसऱ्या टप्प्यात त्यांना संधी मिळणार आहे. भरत गोगावले, बच्चू कडू यांना देखील संधी मिळणार आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असंही ते म्हणाले. 


आम्ही कोणतीही वास्तू बळकवण्याचा प्रयत्न करत नाही


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहीद या शब्दावर बोलताना केसरकर म्हणाले. छोट्या शब्दामधून चुकीचा अर्थ काढणं योग्य नाही.  शिंदे हे नक्षलग्रस्त भागात काम करत होते, अनेक धमक्या त्यांना आल्या त्यावेळी जर कुठं दगाफटका झाला असता तर ते शहीदच झाले असते, असं केसरकर म्हणाले. दीपक केसरकर म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हा हिंदुत्वाचा विचार होता. दोन्ही काँग्रेस बरोबर जाणे हा त्यांचा विचार होता.  आपल्या मूळ पक्षासाठी केलेला हा उठाव आहे.  आम्ही कोणतीही वास्तू बळकवण्याचा प्रयत्न करत नाही, असंही ते म्हणाले. दोन्ही काँग्रेस सोबत जाणारे दररोज काहीही बोलतील त्यांना उत्तर देत आम्ही बसू का? असंही ते यावेळी म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या


CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा


संजय शिरसाटांकडून 'कुटुंबप्रमुख' म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, मंत्रिपद न मिळाल्यानं शिंदेंना इशारा?