पुणे : एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत 5 वर्षांनी वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असला तरी प्रत्यक्षात तसं झालं नाही. बुधवारी झालेल्या पीएसआय परीक्षेच्या जाहिरातीत कमाल वयोमर्यादा 28 वर्ष इतकीच कायम ठेवण्यात आली आहे.
गेली अडीच वर्षे या पदाची जाहिरात आलेली नव्हती आणि सरकारने वयोमर्यादा वाढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर या विद्यार्थ्यांनी जोमाने तयारी सुरु केली होती. पण सध्याच्या जाहिरातीत वयाच्या अटीत काहीच बदल न केल्यानं विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.
पीएसआय परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विदयार्थ्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे सरकारनं वाढीव वयोमर्यादा द्यावी अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.