Mumbai Pune Train  Cancel : मुंबई- पुणे किंवा पुणे-मुंबई ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई विभागात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मुंबई- पुणे किंवा पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. आज (19 जुलै) आणि उद्या (20 जुलै) या ट्रेन बंद असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

Continues below advertisement


यात डेक्कन क्विन, सिंहगड एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी या पुणे - मुंबई धावणाऱ्या ट्रेनचा समावेश आहे. या ट्रेन पुणे मुंबई दररोजचा प्रवास करणाऱ्या नोकरदारवर्गासाठी महत्वाच्या आहेत. मात्र मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक परिसरातील रुळांवर पाणी साचल्यामुळे या ट्रेन रद्द करण्यात आल्याचं रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 


कोणत्या ट्रेन रद्द?


1)  डेक्कन क्विन- 12123 सीएसएमटी-पुणे 19.7.23  आणि12124   पुणे-सीएसएमटी 20.7.23
2) सिंहगड एक्सप्रेस- सीएसएमटी -पुणे 19.07.23 आणि 11010 पुणे-सीएसएमटी20.07.23 
3) डेक्कन एक्स्प्रेम- पुणे-सीएसएमटी  19.07.23  आणि 11007 सीएसएमटी-पुणे 20.07.23 
4) इंटरसिटी- पुणे-सीएसएमटी 19.07.23 आणि 12127 सीएसएमटी-पुणे  20.07.23 
5) इंद्रायणी- पुणे-सीएसएमटी 19.07.223  आणि 22105 सीएसएमटी-पुणे 20.07.23