नागपुरात पोलिसाच्या घरी पत्नीचा मृतदेह सापडला!
एबीपी माझा वेब टीम | 16 Feb 2017 04:26 PM (IST)
नागपूर : नागपुरात एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरी त्याच्या पत्नीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. धक्कादायक म्हणजे पोलिस मुख्यालय परिसरातच ही घटना घडली आहे. सुनीता पांडे (वय 50 वर्ष) असं मृत महिलेचं नाव आहे. हेड कॉन्स्टेबल अरविंद पांडे यांच्या त्या पत्नी होत्या. गिट्टीखदान पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, सुनीता पांडे यांच्या मृत्यूचं कारण तसंच त्यांच्या मृत्यूबाबत अरविंद पांडे यांना माहिती होती का, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. हा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असून घातपात असू शकतो, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.