मुंबई : राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाचं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जाणार असल्याची माहिती देण्यात आलीये. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह अजित पवार देखील अयोध्येत हजर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अयोध्येत 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार असून यासाठी दिग्गजांना निमंत्रित करण्यात आलंय. 


पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी अनेक दिग्गज अयोध्येत उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यातच आता अजित पवार यांना देखील राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलंय. राम मंदिराच्या उद्घाटनाकरता महाराष्ट्रातून सात पक्षप्रमुखांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. 


महाराष्ट्रातून निमंत्रित करण्यात आलेल्या नेत्यांची यादी



  • मनसे अध्यक्ष  राज ठाकरे (Raj Thackeray)

  • वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)

  • रिपाई खासदार रामदास आठवले (Ramdas Athwale)

  • उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)

  • राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) 

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)

  • माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 


कोण जाणार प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला?


राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून विविध कलाकार मंडळी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनाही निमंत्रित करण्यात आलं आहे.आता कोण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार याची उत्सुकता लागली आहे. शरद पवारांनी मी राम मंदिरात गर्दीत जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. आता अजित पवार काय भुमिका घेणार? ठाकरे बंधूपैकी कोण जाणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 


महाराष्ट्रातील 355 साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण


महाराष्ट्रातून एकूण 889 जणांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून त्यामध्ये 534 विशेष निमंत्रित आहेत.  त्यामध्ये उद्योग, क्रीडा, कला तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे.तर महाराष्ट्रातील 355 साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आलं आहे.


हेही वाचा : 


Ram Mandir : महाराष्ट्रातील सात प्रमुख नेत्यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, निमंत्रितांची यादी 'माझा'च्या हाती