Ajit Pawar : एक लाख कोटी रुपये लागले तरी चालतील पण पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचं पाणी गोदावरी खोऱ्यात आणायचे आणि हे पाणी मराठवाड्याला द्यायचा निर्णय आम्ही घेतल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. निवडणुका येतील निवडणुका जातील, पण बीड (Beed) जिल्ह्यासाठी जे जे करायचे ठरवले ते ते करण्याचा प्रयत्न केल्याचे अजित पवार म्हणाले. जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील, विकासाचा बॅकलॉग भरुन काढायचा असेल, राज्यातील साखर कारखानदारी संकटातून बाहेर काढायची असेल काही निर्णय घ्यावे लागतात असेही ते म्हणाले. 


काही जणांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. परंतू मी त्यावर बोलणार नाही. कारण मी काम करणारा माणूस आहे. कामाला पहाटे सुरुवात करतो, कारण काम  ही आपली पॅशन असल्याचे अजित पवार म्हणाले. 2012 पासून धनंजय माझ्यासोबत काम करत आहे. कायम त्याच्यावर संघर्ष करण्याची वेळ आली. 2014 पासून आदर्श विरोधी पक्षनेता म्हणुन काम केल्याचे अजित पवार म्हणाले.


राजकीय जीवनात चढउतार येतात, त्यांना सामोरं जायचं असतं


आष्टी पाटोदा शिरुर मतदार संघातील प्रश्न सोडवायचे आहेत. मंत्रालयात बसून मीटिंग घेणं आणि काम करणं सूरु आहे.
केंद्र आणि राज्य एका विचाराचे असल्याचे अजित पवार म्हणाले. राजकीय जीवनात चढउतार येतात, त्यांना सामोरं जायचं असतं. बीडच्या सभेच्या निमित्ताने सांगायचं आहे की, आम्ही जरी युतीच्या सरकारंमध्ये असलो तरी सर्व जाती धर्मात जातीय सलोखा राखला गेला पाहिजे. जनतेला हे सरकार आपलं आहे हे आम्ही कृतीतून दाखवून देऊ असे अजित पवार म्हणाले. 


विरोधक सत्तात्याने दिशाभुल करतात


कांदा प्रश्न झाला त्यावेळी आम्ही धनंजय मुंडे यांना सांगितल की दिल्लीला जा. मी आणि मुख्यमंत्री सातत्याने पियूष गोयल यांच्यशी बोलतं होतो. 2 हजार 410 रुपये प्रती क्विंटल भाव काढला आहे. 2 लाख क्विंटल कांदा आम्ही खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार म्हणाले. शेतकरी हीच माझी जात आहे. शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी आल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे अजित पवार म्हणाले. पश्चिमीकडील पाणी पूर्वेकडे वळवल्याशिवाय मराठवाडा पाणी प्रश्न सुटणार नाही. जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेत असणं गरजचे आहे. म्हणून आम्ही हा निर्णय घेतल्याचे अजित पवार म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Ajit Pawar : 'राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो'; अजित पवारांचे बीडच्या सभेत वक्तव्य