मुंबई : सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक, तसेच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी 1 ऑगस्ट 2018 रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 3 ऑगस्ट 2018 रोजी होईल. त्यासाठी संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली.


सांगली महानगरपालिका


सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेची मुदत 13 ऑगस्ट 2018 रोजी संपत आहे.

  • सांगली शहराची एकूण लोकसंख्या - 5 लाख 2 हजार 793

  • मतदारांची संख्या - सुमारे 4 लाख 23 हजार 366

  • एकूण प्रभाग - 20

  • एकूण जागा - 78

  • आरक्षण - महिलांसाठी 39 जागा, अनुसूचित जातींसाठी 11, अनुसूचित जमातींसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 21 जागा राखीव आहेत.


जळगाव महानगरपालिका


जळगाव महानगरपालिकेची मुदत 19 सप्टेंबर 2018 रोजी संपत आहे.

  • जळगाव शहराची एकूण लोकसंख्या - 4 लाख 60 हजार 228

  • मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 65 हजार 15

  • प्रभाग - 19

  • जागा - 75

  • आरक्षण - महिलांसाठी 38 जागा, अनुसूचित जातीसाठी 5, अनुसूचित जमातीसाठी 4 , तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20  जागा राखीव आहेत.


वसई-विरार शहर महानगरपालिका

वसई-विरार शहर महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 97 च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील 1 ऑगस्ट 2018 रोजी मतदान होईल.

निवडणूक कार्यक्रम

  • उमेदवारी अर्ज दाखल दाखल करण्याची मुदत : 4 ते 11 जुलै 2018

  • उमेदवारी अर्जांची छाननी : 12 जुलै 2018

  • उमेदवारी मागे घेण्याची तारीख : 17 जुलै 2018 पर्यंत

  • निवडणूक चिन्ह वाटप : 18 जुलै 2018

  • मतदान : 1 ऑगस्ट 2018

  • मतमोजणी : 3 ऑगस्ट 2018