CM Eknath Shinde Dasara Melava 2023 : जसे मोगलांच्या काळामध्ये त्यांच्या घोड्यांना पाणी पिताना संताजी-धनाजी दिसायचे तसे तुम्हाला मी दिसतोय का? असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. गहान टाकलेली शिवसेने सोडवण्याचे काम मी केले. मी गुन्हा केलाय का? असे शिंदे म्हणाले. मी मुख्यमंत्री झाल्यापासून सरकार पडणार पडणार म्हणत होते. मात्र, आमचे सरकार मजबूत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, आमच्याकडे 210 आमदार आहेत. जोपर्यंत जनता माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मला पदाची अपेक्षा नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. 


कोरोनाच्या काळात तुम्ही घरे पैसे मोजत होता. खिचडीमध्ये पैसे खाल्ले, ऑक्सीजनमध्ये पैसे खाल्ले, कुठे फेडाले हे पाप. तुम्हाला जनता माफ करणार नाही. मुंबई पालिकेच्या कामात तुम्ही काळ्याचं पांढर करत होतात. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबईला कोणाचा बाप तोडू शकत नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. तुम्ही सगळे बंद केलेलं आम्ही सुरु केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. कोरोनाच्या काळात तुम्ही घरे पैसे मोजत होता. खिचडीमध्ये पैसे खाल्ले, ऑक्सीजनमध्ये पैसे खाल्ले, कुठे फेडाले हे पाप. तुम्हाला जनता माफ करणार नाही. मुंबई पालिकेच्या कामात तुम्ही काळ्याचं पांढर करत होतात. 2005 च्या पुरात बाळासाहेंबांना एकटे सोडून तुम्ही गेलात. तुम्ही बाळासाहेबांचे होऊ शकत नाही असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. 


इंडिया आघाडीवरही एकनाथ शिंदेंची टीका


यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी भाजप विरोधात तयार झालेल्या इंडिया आघाडीवर देखील टीका केली. जनता दहा तोंडी इंडिया रावणाचे दहन केल्याशिवाय राहणार नसल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आमची महायुती लोकसभेच्या निवडणुकीत 48 पैकी 45 जागा जिंकेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तुमची देना बँक नव्हती, तुमची फक्त लेना बँक होती असे म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली. मी मुख्यमंत्री झालो तरी माझ्यात काय बदल झालाय का? मुख्यमंत्री झालो तरी मी कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. आजही करणार आणि उद्याही करत राहणार असे एकनाथ शिंदे म्हणाले. तुम्हाला सर्वांना मी माझा मुख्यमंत्री समजतो. आजही रस्त्यावर उतरुन मी काम करत आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्यामुळं अनेकांना पोटशुळ उठला आहे. शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये का? सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हावं का? असा काय नियम आहे का? असे म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली.


महत्त्वाच्या बातम्या:


Eknath Shinde : छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो, मराठा समाजाला आरक्षण देणार: एकनाथ शिंदे शिवरायांसमोर झुकले, समाजाला आश्वासन दिलं