dasara melava 2022 : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बुधवारी होणार आहे. दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून आपापल्या दसऱ्या मेळाव्याला गर्दी खेचण्याचा प्रयत्न होणार आहे. राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा कस लागणार आहे. पोलिसांवरील ताणही वाढणार आहे. त्यामुळेच दसरा मेळावाला वाहतूक व्यवस्था आणि कायदा सर्व काही सुरळीत ठेवण्याबाबत पोलिसांकडून तयारी करण्यात येत आहे.  बंदोबस्त करत असताना हलगर्जीपणा करु नका तसेच मेळाव्यात पक्षपातीपणा करु नका, असा आदेश पोलिसांना देण्यात आला आहे. पोलीस उप आयुक्त संजय लाटकर यांनी परिपत्रक काढत पोलिसांना स्पष्ट आदेश दिले आहेत.


मुंबईतील सर्व सह पोलीस आयुत, उपायुत्त व स्थानीक व वाहतुक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी याना आदेश देण्यात आले आहेत. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्याने दसरा मेळावा बंदोबस्तचे आयोजनाबाबत उदासिनता किंवा पक्षपाती दृष्टिकोन निर्दशनास आल्यास याची गांभीर्याने दखल घेतील जाणार आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्हातून चार हजार बसेस व दहा हजार लहान व मोठी वाहने विविध राजकीय गटाचे कार्यकर्ते व सामान्य नागरिक मोठया संख्येने शिवाजी पार्क, दादर व एम. एम. आर. डी. ए. बांद्रा या ठिकाणी दसरा मेळावाला  येणार आहेत. जर या रस्त्यावर वाहतूक कोडी झाली किंवा गाडी एकच ठिकाणी थांबली तर कार्यकर्ता रस्त्या वर उतरून चालत जाण्याची शक्यता आहे. म्हणून दोन्ही ठिकाणी येण्या जाण्याचा रस्त्यावर वाहतूक व्यवस्था आणि कायदा व सुवस्थाची  अत्यंत आवश्यकता आहे.


दोन्ही गटाचे कार्यकर्ते मेळाव्याला येणार असून वादविवाद व कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.  त्याच दिवशी देवी विसर्जन देखील आहे आणि सामान्य नागरिकांना हि त्रास होता कामा नाही यांची दक्षता ग्यावी आणि त्या प्रमाणे बंदोबस्तची नियोजन करावे, असे पोलीस उप आयुक्तांनी सांगितलेय. 


उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात पोलिसांचा बंदोबस्त कसा असेल? 


शिवाजी पार्क, दसरा मेळावा
2 डीसीपी
3 एसीपी
17 पोलीस निरिक्षक
60 एपीआय/पीएसआय
420 पोलीस कर्मचारी
- 65 पोलीस हवालदार
- 2 RCP प्लॅटून
- 5 सुरक्षा बल पथक
- 2 QRT शीघ्र कृती दल
- 5 मोबाईल वाहने


बीकेसी, दसरा मेळावा
4 डीसीपी
4 एसीपी
66 पोलीस निरिक्षक
217 एपीआय/पीएसआय
1095 पोलीस कर्मचारी
410 पोलीस हवालदार
8 RCP प्लॅटून
5 सुरक्षा बल पथक
5 शीघ्र कृती दल
14 मोबाईल वाहनं