Ambabai Mandir Navratri : शारदीय नवरात्रोत्सवाच्या नवमीला करवीर निवासिनी श्री अंबाबाईची विश्वेश्वरी जगध्दात्रीच्या रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली. गजानन मुनीश्‍वर आणि मुकुल मुनीश्‍वर यांनी ही पूजा बांधली. गेल्या नऊ दिवसांपासून विविध रुपात अंबामातेची पूजा बांधण्यात आली. जगदंबेची अनेक रुपे असली, तरी तिची प्रतिष्ठा आणि महिमा प्रत्येकाला समजणे अशक्य आहे.


विश्वेश्वरीचा अर्थ म्हणजेच ती जगाची मालकीण आहे आणि जगधात्री म्हणजे संपूर्ण जगाची धारक आहे. या नऊ दिवसांमध्ये विविध रूपातील जगदंबेचे दर्शन घेतले. परंतु, या नऊ रूपांखेरीजही तिची अनेक रूप आहेत. त्या सगळ्यांचे वैभव जाणून घेणे निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे जे घडू शकतं ते घडू न देणारी आणि जे घडणार नाही‌ तेही सहज घडवणारी अशी अतर्क्य जगदंबा म्हणजेच विश्वेश्वरी जगद्धात्री जगदंबेच्या या वैभवाला जाणून घेतलं, तर तिची कृपा झाल्यावाचून राहणार नाही.


अंबामातेची नऊ दिवसांमध्ये खालील स्वरुपात पूजा बांधण्यात आली 



  • पहिल्या माळेला करवीर निवासिनी अंबाबाईची सिंहासनारूढ या रूपात पूजा बांधण्यात आली.

  • द्वितीय माळेला अंबाबाईची दुर्गा देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.

  • तृतीय माळेला अंबाबाईची सिद्धीदेवी रुपातील अलंकार पूजा बांधण्यात आली.

  • चौथ्या माळेला अंबाबाईची मदुराई निवासिनी मीनाक्षीच्या रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली.

  • ललिता पंचमीला करवीर निवासिनी अंबाबाईची गजारुढ रुपात पूजा बांधण्यात आली.

  • सहाव्या माळेला अंबाबाईची भक्ती मुक्ती प्रदायिनीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.

  • सप्तमी तिथीला अंबाबाईची शाकंभरी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली.

  • अष्टमी तिथीला महिषासुरमर्दिनी रुपात पूजा बांधण्यात आली.

  • नवमीला करवीर निवासिनी श्री अंबाबाईची विश्वेश्वरी जगध्दात्रीच्या रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली. 


इतर महत्वाच्या बातम्या