नवी दिल्ली : राजपथावरील पथसंचलनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकाचे नेतृत्व करण्याचा मान महाराष्ट्राकडे आला आहे. पुणे येथील सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ इंजिनियरींग कॉलेजचा विद्यार्थी दर्पेश डिंगर एनएसएस पथकाचे नेतृत्व करणार आहे.
मुळचा नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातील तोकडे गावचा दर्पेश डिंगर याने आवाज, शिस्त, नियमितता व मेहनतीच्या जोरावर राजपथावरील पथसंचलनात एनएसएस पथकाच्या नेतृत्वाचा मान पटकविला आहे. त्याचे वडिल व्यवसायाने शेतकरी आहेत.
प्रजासत्ताक दिनी राजपथावर पथसंचलनात सहभागी होण्यासाठी एनएसएसच्या विद्यार्थ्यांमध्ये देशपातळीवर मोठी स्पर्धा असते. पथसंचलनातून संपूर्ण देशातील सामर्थ्य व संस्कृतीचे दर्शन घडते या सोहळ्यात सहभागी 160 विद्यार्थ्यांच्या एनएसएस पथकाचे नेतृत्व करायला मिळणे ही अभिमानाची बाब असल्याची भावना दर्पेशने व्यक्त केली.
यापूर्वी प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथ संचलनात राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे नेतृत्व करण्याचा बहुमान महाराष्ट्राच्या सोपान मुंडे, खूशबू जोशी आणि आसिफ शेख यांनी मिळविला आहे.
यावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयांतर्गत येथील चाणक्यपुरी भागातील इंटरनॅशनल यूथ होस्टेल येथे एनएसएस सराव शिबिराला 1 जानेवारी पासून सुरुवात झाली आहे. एनएसएसच्या देशभरातील 15 विभागांमधून एकूण 200 एनएसएस विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्रातील सर्वच 14 आणि गोव्यातील 2 अशा एकूण 16 विद्यार्थी - विद्यार्थींनीची या पथसंचलनासाठी निवड झाली आहे. देशभरातील 15 विभागांमधून एकूण 200 एनएसएस स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले असून यापैकी 160 विद्यार्थ्यांची पथसंचलनासाठी निवड झाली आहे.
नाशिकचा शेतकरीपुत्र राजपथावर नेतृत्व करणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jan 2019 12:39 PM (IST)
मुळचा नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातील तोकडे गावचा दर्पेश डिंगर याने आवाज, शिस्त, नियमितता व मेहनतीच्या जोरावर राजपथावरील पथसंचलनात एनएसएस पथकाच्या नेतृत्वाचा मान पटकविला आहे. त्याचे वडिल व्यवसायाने शेतकरी आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -