रोड रोमियोंवर कारवाईसाठी कोल्हापूर पोलिसांचं ‘दामिनी पथक’

Continues below advertisement
कोल्हापूर : महिला आणि मुलींच्या छेडछाडीचं प्रमाण दिवसेंदिवस कोल्हापुरात वाढतच चालल्यानं पोलिसांनी त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महिला छेडछाड प्रतिबंधक पथकाची स्थापना केली आहे. या पथकांकडून सावर्जनिक ठिकाणं आणि महाविद्यालय परिसरात प्रबोधनासोबत रोड रोमियोंवर कारवाईही सुरु झाली आहे. दामिनी पोलीस पथक या पथकाचं नाव आहे.   तुम्ही जर आपल्या गाडीवरून ट्रिपलसीट महाविद्यालय परिसरातून जात असाल आणि एखाद्या मुलीला त्रास देत असाल तर सावधान! कारण तुमच्या पाठीवर पोलिसांची काठी बसणार, हे मात्र नक्की आहे. महाविद्यालय भरताना आणि सुटताना बाईकवर बसून मुलींची छेड काढणारे रोड रोमियोची संख्या वाढली आहे. तर मुलींचा पाठलाग करुन त्यांना त्रास देणाऱ्यांचे प्रतापही अता पुन्हा कॉलेज परिसरात चर्चेले जाऊ लागले आहे. त्या बद्दलच्या तक्रारी आल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी अता कोल्हापूरात दामिनी महिला छेडछाड प्रतिबंधक पथकाची स्थापना केली आहे. हे पथक आता आपली कामगीरी करु लागलं आहे. या पथकाला महाविद्यालय परिसरात पाहून मात्र अनेक जण पाठीला पाय लावून पळताना दिसत आहेत.   जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यलाच्या आवारात त्या त्या परिसरातील पोलिस ठाण्यातील महिला अधिकारी, महिला पोलिस कॉन्स्टेबल आणि त्याचे सहकारी सकाळी येतात. परिसरात घुटमळणाऱ्या मजनू आणि मोटर सायकलीवरून रपेट मारण्याऱ्यांची चांगलीच शाळा घेताली जाते. हे पथक मुलींच्या समस्या जाणून घेतं आणि त्यांनी केलेल्या तक्रारींचं निवारण करतात. शिवाय, मुलींना विश्वासही देतात.   गेल्या महिन्यातच गावगुंडांच्या छेडछाडीला कंटाळून पल्लवीनं आत्महत्या केली होती. अशा घटना पुन्हा घडू नयेत, मुलींना निर्भय पणे समाजात वावरावं यासाठी या पथकाची स्थापना करण्यात आली आहे.   सध्या व्हॉट्सअपवरुन या पथकांची माहिती आणि त्यामध्ये कोणत्या महिला अधिकारी आहेत, त्याची नावं आणि मोबाईल नंबर देऊन महिला आणि मुलींना त्रास देणाऱ्यां विरोधात तक्रार देण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola