पालघर : डहाणूमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात गेलेली बोट उलटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बोटीत 40 विद्यार्थी होते, त्यापैकी 32 विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

LIVE : अपघातात तीन विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू, सहा बेपत्ता


सोनल भगवान सुरती आणि जान्हवी हरिश सुरती या 17 वर्षीय दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. दोघीही डहाणूतील आंबेडकरनगरमधील रहिवाशी होत्या.

LIVE : 32 विद्यार्थ्यांना वाचवलं, 8 जण बेपत्ता

कॉलेज समुद्राजवळ असल्यामुळे तासिका संपल्यावर परवानगीशिवाय 40 ते 45 विद्यार्थी डहाणूच्या समुद्रावर गेले होते. सर्व जण पालघर जिल्ह्यातील रहिवासी असून के. एल. पोंडा हायस्कूलचे विद्यार्थी आहेत. ते अकरावी-बारावीचे विद्यार्थी आहेत.



एका खाजगी बोटीने सर्वजण समुद्रात गेले. समुद्र किनाऱ्यापासून काही मीटर अंतरावर ही बोट उलटून विद्यार्थी पाण्यात पडले. सेल्फी घेताना तोल गेल्यामुळे नाव उलटल्याचं एका विद्यार्थ्याने सांगितलं, असं शिक्षकांचं म्हणणं आहे.

घटनेची माहिती मिळताच बचावकार्याला सुरुवात झाली. समुद्रात आजूबाजूला असलेल्या बोटीही विद्यार्थ्यांच्या मदतीला गेल्या. बचावलेल्या विद्यार्थ्यांवर जवळच्या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.