पुणे : बिहारचे माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.वाय. पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यत्व त्यांनी स्वीकारले. डी. वाय. पाटील आधी कॉंग्रेस पक्षातर्फे आमदार राहिले आहेत. म्हणून काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.
डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र सतेज उर्फ बंटी पाटील हे काँग्रेसचे नेते असून ते माजी राज्यमंत्री राहिले आहेत. तर त्यांच्या दुसऱ्या मुलाने 2014 ची विधानसभा निवडणूक पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात कराड दक्षिण मधून शिवसेना पक्षाकडून लढवली होती.
डी.वाय पाटील यांचा कोल्हापूरच्या राजकारणात सक्रिय सहभाग राहिलेला आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातही त्यांची वेगळी ओळख आहे. पाटील 2009 ते 2013 या दरम्यान त्रिपुराचे तर 2013 ते 2014 या काळात बिहारचे राज्यपाल होते. शिवाय ते कोल्हापूरचे महापौरही राहिले आहेत.
दरम्यान पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने काँग्रेस नेत्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. एकीकडे आघाडीबाबत चर्चा सुरु असताना, काँग्रेसमधीलचं मोठ्या नेत्याला पक्षप्रवेश देणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, काँग्रेसमध्ये नाराजी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Dec 2018 12:08 AM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यत्व त्यांनी स्वीकारले. डी. वाय. पाटील आधी कॉंग्रेस पक्षातर्फे आमदार राहिले आहेत. म्हणून काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -