मुंबई : रुग्णसेवेचा 'धंदा' मांडणाऱ्या डॉक्टरांची तातडीनं सर्जरी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मार्च 2018 मध्ये विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कट प्रॅक्टिसवर बंदी आणणारं विधेयक मांडण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर सर्रासपणे रुग्णांची पिळवणूक करत असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयातील डॉक्टरांसोबतच सरकारी डॉक्टरही लुटारु झाले आहेत. कट प्रॅक्टिसमध्ये डॉक्टर विशिष्ट डॉक्टर किंवा औषधांचा आग्रह धरतो. त्यामुळे संबंधित डॉक्टरला मोठा आर्थिक लाभ होतो.
कट प्रॅक्टिसला वेसण घालण्यासाठी तज्ज्ञांनी मसुदा तयार केला आहे. या कायद्याला मंजुरी मिळाल्यास यासंबंधी कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य ठरेल.
गुन्हा सिद्ध झाल्यास पहिल्यांदा 1 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, तर दुसऱ्यादा 2 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
कट प्रॅक्टिस म्हणजे काय?
एखाद्या डॉक्टरने रुग्णाला पुढील उपचारासाठी दुसऱ्या डॉक्टरकडे पाठवल्यानंतर संबंधित डॉक्टरकडून कमिशनच्या स्वरुपात पैसे घेणे
आवश्यकता नसताना रुग्णांना ठराविक प्रयोगशाळेतूनच तपासणी करण्यास भाग पाडणे आणि संबंधित प्रयोगशाळेकडून मोबदला घेणे
रुग्णांना ठराविक कंपन्यांची औषधे घेण्याचा आग्रह धरणे आणि त्याबदल्यात औषध कंपन्यांकडून परदेश दौरे, महागडी भेटवस्तू घेणे
खिसेकापू डॉक्टरांना चाप, कट प्रॅक्टिससंबंधी कायद्याच्या हालचाली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Dec 2017 06:13 PM (IST)
कट प्रॅक्टिसमध्ये डॉक्टर विशिष्ट डॉक्टर किंवा औषधांचा आग्रह धरतो. त्यामुळे संबंधित डॉक्टरला मोठा आर्थिक लाभ होतो.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -