अमरावती : अमरावतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सख्ख्या मामेभावाची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी करण्यात आलेल्या जल्लोषात चक्क नोटांची उळधपट्टी करण्यात आली.


भाजपचे विवेक कलोटी यांची स्थायी समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नोटांची उधळण कार्यकर्त्यांनी केली.

धक्कादायक म्हणजे, एक नगरसेवक चक्क ओठांमध्ये नोटांची घडी दाबून नाचत होता.

यासंदर्भात एबीपी माझाने विवेक कलोटी यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, “तिथे बाजूला लहान मुलं खेळत होते. त्यांच्याकडे खोट्या नोटा होत्या. त्या नोटा मिरवणुकीत उधळल्या गेल्या. त्यामुळे नोटांची उधळण असे म्हणू नका.”

काही हजारांच्या कर्जापायी राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना घडत असताना, राजकीय जीवनातील इतक्या जबाबदार व्यक्तींनी अशी पैशांची उधळपट्टी करणं शोभनीय आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पाहा व्हिडीओ :