नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPI-M) नेते सीताराम येचुरी (Sitaram Yechury hospitalised) यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले  आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. प्रकृती खालावल्यानं येचुरी यांना एम्समध्ये दाखल केलं. सीताराम येचुरी हे माकपचे  सरचिटणीस आहेत.


सीतारा येचुरी यांच्यावर सध्या एम्समध्ये उपचार सुरू आहेत.  येचुरी यांची प्रकृती चिंताजनक असून  सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.  त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.   मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्यांना न्यूमोनियाचा त्रास होत होता.  19 ऑगस्ट 2024 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच काही दिवसापूर्वी त्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया देखील  झाली होती. 


STORY | Sitaram Yechury in 'critical' condition, on respiratory support at AIIMS: Party



READ: https://t.co/5immmjT9DB pic.twitter.com/pBymNw0LlK


— Press Trust of India (@PTI_News) September 10, 2024