LIVE UPDATES | अखेर गव्याला HEMRL कंपनीच्या पाठीमागे असलेल्या जंगलात घालवून देण्यात यश

मोदी सरकारविरोधात आंदोलन तीव्र करणार; संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रव्यापी बैठकीमध्ये एकमताने निर्णयनव्या वर्षाच्या स्वागतासाठी सध्या कुठलीही गाईडलाईन नाही, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची माहितीअतिवृष्टी नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक महाराष्ट्र दौऱ्यावर; आज औरंगाबाद आणि उस्मानाबादमध्ये आढावादेशभरासह राज्यातील महत्वाच्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, आर्थिकसह खेळ आणि मनोरंजनाबाबत महत्वाचे अपडेट्स सोबतच दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Dec 2020 08:18 PM

पार्श्वभूमी

दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...या वर्षीचा शेवटचा 'मन की बात' कार्यक्रम 27 डिसेंबरला, पंतप्रधानांनी विचारलं- पुढच्या वर्षी तुमच्या काय अपेक्षा आहेत?कोरोना महामारीने प्रभावित झालेल्या या वर्षीच्या बाबतीत आपला...More

अखेर गव्याला HEMRL कंपनीच्या पाठीमागे असलेल्या जंगलात घालवून देण्यात यश आलंय. पुणे शहराला लागुन असलेल्या बावधन परिसरात आधीपासूनच अनेक गवे आहेत असं स्थानिकांचं म्हणणे आहे. त्यामुळे या गव्याला पकडण्याएवजी त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठवण्याच निर्णय वन विभाग घेतला होता. त्यासाठी जंगलात जाणारा रस्ता वगळून इतर सर्व बाजूंनी बॅरीकेडींग करण्यात आलं होतं. तेरा दिवसांपूर्वी पुण्याच्या कोथरुड भागात गव्याला पकडण्याच्या प्रयत्नात लोकांनी पाठलाग केल्याने त्या गव्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे यावेळी गव्याला पकडण्याएवजी त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाठवून देण्याचा निर्णय घेण्यात आला.