LIVE UPDATES | उद्या आणि परवा रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता

राज्यसभेत कृषी विधेयकावर चर्चेवेळी शरद पवार अनुपस्थित, विधेयकावर शिवसेना-राष्ट्रवादीची संदिग्ध भूमिका सरकारकडून शेतकऱ्यांच्या मृत्यूचं फर्मान; कृषि विधेयकावरुन राहुल गांधी यांचा मोदी सरकार वर हल्ला रुग्णाला 'ऑक्सिजन' किती द्यायचा हा अधिकार डॉक्टरांचाच! IPL 2020 DC vs KXIP | मयंक अगरवालची धडाकेबाज खेळी अपयशी, आयपीएलमध्ये काल रंगलेल्या सामन्यात पंजाबचा दिल्लीकडून सुपर ओव्हरमध्ये पराभव कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Sep 2020 08:39 PM
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या पूर्व सूचनांनुसार दिनांक 21 व 22 सप्टेंबर, 2020 या कालावधीत रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तसेच दरडग्रस्त, सखल भागातील नागरिकांनी योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी जाऊन स्थलांतर करावे. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. पुराच्या पाण्यातून वाहने चालवू नयेत, इलेक्ट्रिक पोल्स, स्विच बोर्ड, इलेक्ट्रिक वायर्स यांना हात लावू नये, यापासून दूर राहावे. स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे, त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
बारामतीत ३१२ किलो गांज्यासह ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.. या कारवाईत ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.. यात तब्बल ४७ लाखांचा ३१२ किलो जप्त करण्यात आलाय.. हा गांजा आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथून विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे.. सातारा आणि सांगली येथे बारामती मार्गे हा गांजा विक्रीसाठी जाणार आहे.. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.. यानंतर ही कारवाई करण्यात आलीय.
#आकाशवाणी #पुणे केंद्रातील वृत्त निवेदक विजयकुमार लडकत यांचं आज कोविड 19 मुळे निधन झालं; ते 53 वर्षांचे होते. गेली 15 वर्ष ते आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून वृत्त निवेदन करत होते. त्याचबरोबर महात्मा ज्योतीराव फुले यांचे चरित्र व्याख्याते अशी त्यांची ओळख होती. माळी आवाज या संस्थेचे ते संस्थापक होते. अत्यंत मनमिळाऊ आणि दिलखुलास स्वभावामुळे आकाशवाणीमध्ये ते लोकप्रिय ठरले होते. त्यांच्या निधनाबद्दल आकाशवाणीच्या सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.
औरंगाबादमध्ये कोविड सेंटरमध्ये जेवणात अळ्या निघाल्याची रुग्णांनी तक्रार केली म्हणून जेवणाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडून शिवीगाळ. ठेकेदारांनी गुंड आणून मारहाण केल्‍याचाही आरोप.
पुण्यामध्ये कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. या स्थितीवर काबू करण्यासाठी आता केंद्राने टास्क फोर्स पुण्यात पाठवावे. भाजप खासदार गिरीश बापट यांची लोकसभेत आगळी वेगळी मागणी. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांची देखील या संदर्भात भेट घेतली. आम्ही पुणेकर अनेक बाबतीत नंबरवन असतो पण आता कोरोनाच्या बाबतीतला हा नंबर वन क्लेशदायक आहे. पुण्याचे पालकमंत्री एवढ्या बैठका घेतात पण तरीही स्थिती नियंत्रणात का नाही हे त्यांना विचारा, असा खोचक टोला गिरीश बापट यांनी लगावला.
दोन लेकरांसह महिलेची विहिरीत उडी मारून आत्महत्या. शिऊर परिसरातील खरज भीमवाडी येथील घटना.

खरज येथील ज्योती अर्जुन बागुल (वय 27), मुलगा अमित अर्जुन बागुल (वय 7) मुलगी दीदी अर्जुन बागुल (वय 7 महिने) अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही, शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली. शिऊर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रात्रीस खेळ चालेच्या परिसरात पाणीच पाणी. ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याने वेंगुर्ले बेळगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याने आकेरी येथिल रात्रीस खेळ चाले परिसरात वाहनांची मोठी गर्दी.
मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात कॅवीट दाखल करण्याची तयारी. थोड्याच वेळात मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे. मंत्रिमंडळ उपसमितीतील आणि विधी तज्ञासोबत राज्य सरकारच्या पुढच्या रणनीतीचा आढावा घेणार आहे. आज मुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
काळूबाईच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या साताऱ्यातल्या सेटवर कोरोनाची लागण झाली आहे. तब्बल 27 जण कोरोनाबाधित असून सगळ्यांवर उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती चांगली असल्याचं कळतं. तर ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती चिंताजनक असून साताऱ्यातील रुग्णालयात त्या व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्याने साताऱ्यातील चित्रीकरण थांबवलं आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे शासनाच्या वतीने आज 21 सप्टेंबर 2020 रोजी विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे शासनाच्या वतीने आज 21 सप्टेंबर 2020 रोजी विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे.
मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावर चुनाभट्टी येथील के जे सौमया दवाखानासमोरील एवराडनगर येथे एक अजगराने अर्धा ते पाऊण तास वाहतूक विस्कळीत केली होती. सोमय्या मैदानातून एक आठ फूट लांब अजगर या पूर्व द्रुतगती मार्गावर आला आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या एका मोटार कारच्या चाकात जाऊन बसला. स्थानिक नगरसेवक कप्तान मलिक यांनी याची माहिती महाराष्ट्र एनिमल रेस्क्यू असोसिएशनच्या सर्प मित्रांना देताच, सर्प मित्र अभिरुप कदम, सिद्धार्थ गायकवाड आणि सुनील कदम यांनी घटनास्थळी धाव घेऊन मोठ्या शर्थीने अजगराला सुरक्षित बाहेर काढलं. मात्र तोपर्यंत या मार्गावर सायनकडे जाणारी सर्व वाहतूक विस्कळीत झाली होती. तर बघ्यांचीही मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती. अखेर या अजगराला सुरक्षित बाहेर काढल्यानंतर ती कार बाजूला हटवून वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली.
केंद्र शासनाने केलेल्या कांदा निर्यातबंदी अन्यायकारक असून निर्यातबंदी त्वरित मागे घेण्यात यावी या मागणीसाठी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे आज मालेगावी निर्यातबंदी  आदेशाची अंत्ययात्रा काढण्यात आली..यावेळी शेतकरी फाशी घेत असतांनाचा प्रतिकात्मक जिवंत देखाव्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते..सटाणा नाका ते तहसील कार्यलयादरम्यान चाललेल्या या प्रतिकात्मक अंत्ययात्रेत शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून केंद्र सरकारच्या कांदा विषयक धोरणांचा निषेध केला..तहसील कार्यालयाजवळ हे आंदोलन पोलिसांनी थांबवल्यानंतर तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
पालघर : मासे दिले नाही म्हणून दगडाने ठेचून पती पत्नीने एका 70 वर्षीय वृद्धाची हत्या केल्याची धक्कादायक घटना वाडा येथे समोर आलीय. नारायण गणपत चौधरी असं या मयत वृध्दाचं नाव असून नदीवर मासे पकडण्यास गेलेले नारायण घरी परतले नसल्याने कुटुंबयांनी त्यांचा शोधाशोध सुरू केला. तेव्हा सदर इसमाचा मृतदेह रस्त्याशेजारील पालपाचोळ्यात आढळून आला. सदर घटनेचा तपास करत असताना मासे न दिल्याच्या शुल्लक कारणावरून दगडाने ठेचून हत्या केल्याचं उघड झालं. आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून त्याची पत्नी फरार आहे. या दोघांविरोधात वाडा पोलीस ठाण्यात कलम 302 आणि 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला, मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे दोन्ही नेत्यांची भेट, मराठा आरक्षण स्थगितीनंतर पुढील रणनिती ठरवण्यासाठी चर्चा, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही बैठकीला उपस्थित
नांदेड : सकल मराठा समाजाचे घेराव आंदोलन सुरू झाले आहे. आमदार मोहन हंबर्डे यांना घेराव घातण्यात आला आहे. मराठा आरक्षणावरची स्थगिती हटवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
विरार : वसई विरार नालासोपाऱ्यातून मनसे चे पदाधिकारी आंदोलन करणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र मनसे च्या रेल्वे प्रवास या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर वसई, विरार, नालासोपारा रेल्वे स्थानकात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवला आहे. कोणताही मनसैनिक रेल्वेस्थानाकात प्रवेश करणार नाही यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रात्रीपासूनच या परिसरातील 15 च्या वर मुख्य मनसे पदाधिका-यांना 149 च्या नोटीस बजावल्या होत्या.
पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे दाखल,कोरोना रुग्णांची भेट घेतली. सेवासुविधा विषयी रुग्णांना विचारणा केली. गुलाब सॅनिटायझर,मास्क रुग्णांना दिले.
जे रुग्ण बरे होऊन आज डिस्चार्ज घेत आहेत त्यांच्याशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संवाद साधला
भिवंडीत घडलेल्या इमारत दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांच्या निर्देशानुसार मयतांना 5 लाख रुपये तर जखमींचा मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
मराठा आरक्षण स्थगिती प्रकरणी आज पुकारलेल्या सोलापूर जिल्हा बंदमध्ये आंदोलकांनी पंढरपूर पुणे महामार्ग रोखला आहे . वेळापूरच्या पुढे असणाऱ्या निमगाव पाटीजवळ मराठा तरुणांनी रस्त्यावर टायर पेटवून रस्ता अडवला . एक मराठा लाख मराठा च्या जोरदार घोषणा देत दोन्ही बाजूनी वाहतूक आंदोलकांनी रोखून धरली.
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात चार दिवसापासुन विजेच्या कडकडाट सह सततधार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील 81 लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत, बुलडाणा शहराला पानी पुरवठा करणाऱ्या यळगाव धरणात 100 टक्के साठा उपलब्ध झाला असून धरणाचे स्वयंचालित 80 गोडबोले दरवाजे उघडल्या गेले आहेत त्यांमुळे बुलडाणा शहरातील नागरिकांची पाण्याची चिंता मिटली आहे , यंदा जिल्ह्यात भरपूर पाऊस झाल्याने सरासरी 90 टक्के पाऊस पडला आहे , जिल्ह्यात जरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असेल मात्र शेतातील पिकांची मात्र मोठ्या प्रमाणात नासाडीच झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात चार दिवसापासून विजेच्या कडकडाटसह सततधार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील 81 लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. बुलढाणा शहराला पानी पुरवठा करणाऱ्या यळगाव धरणात 100 टक्के साठा उपलब्ध झाला असून धरणाचे स्वयंचालित 80 गोडबोले दरवाजे उघडल्या गेले आहेत. त्यामुळे बुलढाणा शहरातील नागरिकांची पाण्याची चिंता मिटली आहे. यंदा जिल्ह्यात भरपूर पाऊस झाल्याने सरासरी 90 टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यात जरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असेल मात्र शेतातील पिकांची मात्र मोठ्या प्रमाणात नासाडीच झाली आहे.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने बेळगाव येथून पर्यटनासाठी चांदवड तालुक्यातील किटवाड इथे गेलेल्या रेल्वे खात्यातील कर्मचाऱ्याचा धरणात बुडून मृत्यू झाला. कर्मचाऱ्याचे नाव कार्तिक असे आहे. मूळचा चेन्नई आणि सध्या बेळगावातील रेल्वे कॉटर्समध्ये राहत असलेला कार्तिक काही मित्रांसह किटवाड इथे गेला होता. तिथे पाण्यात अडकल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, मुलं,आई-वडील असा परिवार आहे. सध्या कोरोनामुळे त्याचे सर्व कुटुंब तामिळनाडूतील चेन्नई येथे ते स्वगृही आहेत. कोवाड जवळील किटवाड गावाजवळ असलेल्या धरणात ही घटना घडली. घटनास्थळी कोवाड उपविभाग पोलीस स्थानकातील पोलीस अधिकारी मृतदेह शोधत आहेत.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने बेळगाव येथून पर्यटनासाठी चांदवड तालुक्यातील किटवाड इथे गेलेल्या रेल्वे खात्यातील कर्मचाऱ्याचा धरणात बुडून मृत्यू झाला. कर्मचाऱ्याचे नाव कार्तिक असे आहे. मूळचा चेन्नई आणि सध्या बेळगावातील रेल्वे कॉटर्समध्ये राहत असलेला कार्तिक काही मित्रांसह किटवाड इथे गेला होता. तिथे पाण्यात अडकल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, मुलं,आई-वडील असा परिवार आहे. सध्या कोरोनामुळे त्याचे सर्व कुटुंब तामिळनाडूतील चेन्नई येथे ते स्वगृही आहेत. कोवाड जवळील किटवाड गावाजवळ असलेल्या धरणात ही घटना घडली. घटनास्थळी कोवाड उपविभाग पोलीस स्थानकातील पोलीस अधिकारी मृतदेह शोधत आहेत.
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षण स्थिगिती विरोधात आज बंद पुकारण्यात आलेलं आहे. तर जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर देखील आंदोलन करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात माढामध्ये उग्र स्वरूपाच्या निदर्शने करून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. तर शहरात सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्याघरासमोर आंदोलनसाठी कार्यकर्ते एकत्रित जमणार आहेत. शहरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे.
उस्मानाबाद जिलह्यातल्या तेर येथून तीन किलोमीटरवर असलेल्या तेरणा धरणातील पाणीसाठा पुर्ण भरल्याने धरणाच्या स्वंयचलित 17 दरवाज्यातून पाणी पडण्यास सूरूवात झाली आहे. तीन वर्षांपूर्वी हे धरण भरले होते. गेल्या वर्षांची चांगला पाऊस झाला होता. याही वर्षी रेकार्ड ब्रेक पाऊस होण्याची शक्यता आहे. जिल्हयातल्या सर्वंच मंडळात चांगला पाऊस पडला आहे. एकीकडे कोरोनामुळे आर्थिक संकट असताना चांगला पावसामुळे रबीची आशा वाढली आहे. पण खरिपातली सोयाबीन, उडीद, मूगाला कोंब फिटले आहेत.
अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर प्रतिक्षा वालदेकर यांचा आज दुपारी कोरोणामुळे मृत्यू. नागपूरच्या किंग्स वे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. डॉ. प्रतिक्षा वालदेकर या अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पॅथॉलॉजी विभागात होत्या कार्यरत होत्या. डॉ. प्रतिभा या गर्भवती होत्या. त्यांच्या बाळाचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.
खोपोली शहरात पावसाची जोरदार हजेरी, बाजारपेठेत पाणी साचले..

अर्धा तासाच्या मुसळधार पावसामुळे खोपोली बाजारपेठेत पाणी शिरले

नाले, गटारे भरल्याने बाजरपेठेत पाणी साचले...
गोकुळ शिरगाव एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग. सरोज पॉलिमर कंपनीचे आगीत एक ते दीड लाखाचे नुकसान, शॉर्ट सर्किटने आग लागण्याचा अंदाज. कोल्हापूर महापालिका, कागल नगरपालिका आणि इतर अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवली. साधारण दीड तास प्रयत्न केल्यानंतर आग विझवण्यात यश.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या मार्फत खाकी वर्दीचा सन्मान सोहळ्याला सुरुवात. कोरोनाकाळात कायदा, सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा होणार सन्मान. कर्तव्य बजावताना कोरोनामुळे दुर्दैवी निधन झालेल्या पोलिसांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले जाणार : गृहमंत्री अनिल देशमुख. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर देखील कार्यक्रमाला उपस्थित.

आजपासून पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.
आज सकाळी एका व्यक्तीने बोईसरच्या चिन्मय रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, आत्महत्या करणाऱ्यांचे नाव चंद्रकांत चौधरी आहे,
सकाळीच दुसऱ्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले व डॉक्टरांनी त्याचा उपचार सुरू केला पण उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास बोईसर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील हे करीत आहेत.
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनी कोरोनावर मात केली आहे. आज त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. परमेश्वराच्या कृपेने आणि सर्वसामान्य लोकांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करत पुन्हा लोकांच्या मदतीसाठी उपलब्ध असणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनी कोरोनावर मात केली आहे. आज त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. परमेश्वराच्या कृपेने आणि सर्वसामान्य लोकांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करत पुन्हा लोकांच्या मदतीसाठी उपलब्ध असणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
कोरोनामुळे हाताला काम नाही, व्यसनाधीन बापाने पोराचा चक्क तृतीय पंथीयाला विकलं?,

कोल्हापूरच्या गंगावेश परिसरात राहणाऱ्या बापाचा संतापजनक प्रकार,

सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नातेवाईक चिमुकल्याला आणायला गेल्यावर तृतीयपंथीयांनी पाच लाख परत मागितले,

पोलिसांनी चिमुकल्याला बाल कल्याण समितीच्या ताब्यात दिलं
मुंबईत 18 ठिकाणी मराठा आंदोलक आंदोलन करणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 4 व्हॅन आणि 100 ते 150 पोलीस आंदोलन स्थळी तैनात आहेत. आंदोलक देखील सोशल डिस्टन्सचा प्रश्न निर्माण होऊ नये याससाठी योग्य खबरदारी घेत आहेत.

अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला,

आजपासून पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
कोल्हापुरात मराठा आंदोलकांना पोलिसांच्या नोटिसा,

उद्या सरकारचे प्रतिकात्मक श्राद्ध घालून करणार होते आंदोलन,

परवानगी नाकारूनही आंदोलन केल्यास कारवाई केली जाईल अशी पोलिसांची माहिती,

पोलिसांच्या दबाव तंत्राला न झुकता आंदोलन करण्यावर मराठा आंदोलक ठाम,
मनसे सोमवारी लोकल सुरू करण्यासाठी लोकल मध्ये प्रवास करून सविनय कायदेभंग आंदोलन करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना रेल्वे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.दादर रेल्वे पोलिस स्टेशन आणि मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी संदीप देशपांडे यांना ही नोटीस पाठवली आहे.शिवाय, रेल्वेने प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा या नोटीस मध्ये सांगण्यात आलाय.


मुंबईकरांचे होत असलेले हाल लक्षात घेत त्यांना रेल्वेने प्रवास करू द्यावा अशी देशपांडे यांनी सरकार कडे केली आहे. मात्र, या नोटीस जरी मला पाठवल्या असल्या तरी आम्ही आंदोलन करणार असून आम्ही आमच्याया मागणीसाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे. शिवाय आम्ही आमच्याया भूमिकेत सरकारमध्ये बसलेल्या राजकीय पक्षासारखा यु टर्न घेत नसून भमिकेवर ठाम असल्याच त्यांनी म्हटलं आहे
शरद पवार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीत खालील मुद्यांवर चर्चा

- केंद्र सरकारने आणलेली शेतकर्‍यांशी संबधित विधेयक
- या विधेयकाला शिवसेनेने लोकसभेत पाठिंबा दिला आहे
- आता शरद पवारांच्या भेटीनंतर शिवसेना राज्यसभेत काय भूमिका घेणार याकडे लक्ष
- राज्यातील ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोरानाच्या रुग्णांबाबतही चर्चा
- मराठा आरक्षणाबाबत चर्चा

सोलापूर जिल्ह्यात 21 सप्टेंबर रोजी एसटी वाहतूक पूर्णपणे बंद, मध्यरात्री 12 पासून 21 तारखेच्या रात्रीपर्यंत जिल्ह्यातील एसटी सेवा बंद ठेवण्याचे आदेश, सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश, आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी एसटी बसेस बंद ठेवण्याचे निर्देश
राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण, घरात काम करणाऱ्या काही लोकांना लागण झाल्याने करून घेतली चाचणी. चाचणीत आमदार मुनगंटीवार यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संसर्गाचे प्रमाण शोधण्यासाठी अन्य चाचण्या करून घेतल्या जात आहेत. घरीच उपचार केले जाणार असल्याची माहिती. घरातील अन्य सदस्यांची देखील केली जाणार कोरोना चाचणी.
कोरोनाच्या संकटामुळे संसदेचे अधिवेशन एक आठवडा आधीच गुंडाळले जाण्याची शक्यता

संसदीय कामकाज समितीत अनेक पक्षांच्या प्रतिनिधींनी आज अधिवेशन लवकर संपवण्याची मागणी केली

या आठवड्यापर्यंत कामकाज होण्याची शक्यता आहे..

अनेक मंत्री खासदार हे कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत...

आत्तापर्यंत जवळपास तीस खासदार मंत्री पॉझिटिव्ह सापडले आहेत..
एबीपी माझाच्या पाठपुराव्याला यश, मुंबई लोकलमधून खासगी आणि सहकारी बँकांतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा, राज्य सरकारच्या विनंतीवरून रेल्वे बोर्डाने दिली परवानगी, मात्र एकूण कर्मचाऱ्यांच्या केवळ 10% कर्मचारीच प्रवास करू शकणार, त्यांनाही क्यूआर कोड बंधनकारक
राज्यात यावर्षी 190 साखर कारखाने सुरू होतील असा अंदाज आहे आत्तापर्यंत काही कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले अशा राज्यातील सर्व कारखान्यांना ऊस गाळप हंगाम संपेपर्यंत कारखान्यावर ती 25 बेडचे हॉस्पिटल बंधनकारक करण्यात आले आहे साखर आयुक्तांनी तसे अर्ज आदेश दिलेत
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिग्ज संघात काहीच वेळात रंगणार सामना. चेन्नईचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय
शिर्डी - राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल, राजूर पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल,
ग्रामपंचायत शिपायाला मारहाण केल्याचा आरोप,
गाडी हळू चालवा सांगितल्याचा राग आल्यानं मारहाण केल्याचा शिपाई रामदास बांडे यांचा आरोप
वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे क्षुल्लक करणातून युवकाची हत्या. घराच्या अंगणात उभा असताना धारदार शस्त्राने वार करून हत्या. दोघेही मित्र असल्याच बोललं जातंय. हत्येच्या कारणासह प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू. बापू उर्फ राजेश गुप्ता (वय 25) असे मृतकाचे नाव.
राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण. बच्चू कडू यांनी स्वतः ट्विटरद्वारे दिली माहिती. संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घेण्याच केलं त्यांनी आवाहन.
औरंगाबादेत विद्यापीठात उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांची बैठक आहे, त्यांचा ताफा विद्यापीठ परिसरात प्रवेश करताच एमआयएमच्या विद्यार्थी आघाडीने ताफा अडवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, ऑनलाइन परीक्षेतील संभ्रम, ग्रामीण विद्यार्थ्यांची अडचण, आणि विद्यापीठाचे विभाजन या साठी हे आंदोलन करण्याचा प्रयत्न होता..
घराचे छत कोसळून 79 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली. कर्जत तालुक्यातील अखेगाव परिसरात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे अखेगाव येथील एका घराचे छत कोसळून नानभाऊ शंकर कोल्हे या शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. नानभाऊ कोल्हे यांची पत्नी कौसबाई आणि सून सीताबाई या शेळ्या बांधण्यासाठी शेतात गेल्या असता ही घटना घडली. दरम्यान घराचे छत पडल्याचा आवाज आल्याने तातडीने ग्रामस्थांनी बचावकार्य सुरू केले, मात्र नानभाऊ कोल्हे यांचा मृत्यू झाला.
भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सकाळी 8.30 वाजता लीलावती हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

गेले महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते.

5 वेळा नगरसेवक आणि 3 वेळा मुलुंडचे आमदार होते
निसर्ग चक्रीवादळाचा फटका भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोकणातील मुळगाव आंबडवेला देखील बसला. त्यानंतर या गावाला उभं करण्यासाठी दलित इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज अर्थात डिक्कीनं पुढाकार घेतला आहे. प्रत्येक घराला उद्योग,त्यासाठी लागणारा कच्चा माल आणि निर्मितीचे प्रशिक्षण यासाठी सारी तयारी करण्यात आली असून गावात अगरबत्ती, सोलर चरखा, रूमाल उद्योग सारखे व्यवयास सुरू केले जाणार आहे. त्याकरता रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील या मुळगावी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तयार झालेला माल परदेशात निर्यात केला जाईल असा मानस यावेळी डिक्कीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केला. बाटू अर्थात खादी ग्रामोद्योग मंडळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ आणि डिक्की यांनी आंबडवे हे गाव दत्तक घेतले आहे.
मुंबईनंतर पुण्यात ही जमावबंदी लागू करावी का? हे लोकप्रतिनिधींना विचारुन ठरवा. असं पालकमंत्री अजित पवारांनी आदेश दिले. याबाबत एबीपी माझाने लोकप्रतिनिधींना विचारलं असता, जमावबंदी अथवा संचारबंदी लागू करण्यास हरकत नाही पण जनतेला वेठीस धरू नये त्याऐवजी आरोग्य व्यवस्था सक्षम कशी करता येईल, त्यामध्ये सुसूत्रता कशी आणता येईल याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. असं पुणे भाजप आणि मनसेने भूमिका घेतली आहे तर पिंपरी-चिंचवड भाजप याबाबतीत अद्यापि संभ्रमात आहे. दुसरीकडे गेल्या लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांनी देखील जमावबंदी अथवा संचार बंदी लागू करण्यापेक्षा नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करत आहेत.
वरळी येथे आर. जी. थडाणी मार्ग, काकड इस्टेड बिल्डिंगच्या मागील संरक्षण भिंत पडली. सकाळी 8.30 ची घटना. कोणतीही जीवितहानी झालेली नसून फक्त गाड्यांचे नुकसान झाले आहे
सातारा जिल्हातील पाटण तालुक्यातील दुसाळे गावातील सचिन संभाजी जाधव यांना भारत चीन सीमेवरील लेह लडाख भागात वीरमरण आले. बुधवारी भारत चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना त्यांना हे वीरमरण आले. त्यांचे पार्थिव आज त्यांच्या गावाकडे रवाना होत आहे. शहीद सचिन जाधव यांच्या पश्चात आई वडील ,पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.शहीद सचिन जाधव यांचे पार्थिव रात्री उशिरा दिल्लीतून पुण्याला पोहचले आहे. सचिन यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी दुसाळेला पोहचेल आणि त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. भारत-चीन यामध्ये सुरू असलेल्या संघर्षात हे जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तारळे येथेपार्थिव पोहोचले असून तेथून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसाळे गावापर्यंत त्यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीतून घेऊन जात आहेत. गावा गावात त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ग्रामसम्थांनी रस्त्यावर फुलांचा सडा टाकला आहे. सचिन जाधव हे तीन महिन्यांपूर्वी दोन महिन्याच्या सुट्टीसाठी गावी आले होते मात्र भारत चीन तनाव वाढत असल्यामुळे त्यांची एक महिन्याची सुट्टी रद्द करण्यात आली होती. काही दिवसापूर्वीच येऊन गेलेले सचिन यांच्या अशा जाण्याने सर्वांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पंढरपूर सातारा रस्त्यावरील उपरी येथील पुलावर पाणी आल्याने साताराकडे जाणारी वाहतूक बंद तर पंढरपूर पुणे रस्त्यावरील भांडीशेगाव पुलावर पाणी आल्याने पुणेकडे जाणारी वाहतूकही बंद झाली
मध्य रेल्वेच्या आटगाव स्टेशन जवळ लोकलचा डबा रुळावरून घसरला, त्यामुळे आसनगाव ते कसारा वाहतूक ठप्प, डब्यात होते 8 ते 9 प्रवासी, कोणालाही दुखापत झाली नसल्याचा मध्य रेल्वेचा दावा, सकाळी 7.28 ला झाला अपघात, हा डबा पुन्हा रुळावर ठेवण्याचे काम सुरू
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात उद्या बैठक होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत राज्य सरकारचे शिष्ट मंडळ कांद्याच्या प्रश्नावर जाणार आहे. मराठा आरक्षण, इंदू मिल अशा विविध विषयांवर दोघांमध्ये चर्चा होऊ शकते.
दुसाळे ता. पाटण येथील जवान सचिन संभाजी जाधव (वय 38) हे लेह-लडाख सिमेवर कर्तव्य बजावत असताना झालेल्या चकमकीत शहीद झाले. ही घटना बुधवारी दिनांक 16 सप्टेंबरला घडली. शनिवार दिनांक 19 रोजी त्याच्या पार्थिवावर दुसाळे ता. पाटण या त्याच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासाठी ग्रामस्थ व प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. आकस्मिक धडकलेल्या बातमीने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून विभागावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
सांगली - आटपाडी तालुक्यात दुपारपासून मुसळधार पाऊस, अनेक पूल पाण्याखाली, अनेक गावाचा संपर्क तुटला, आटपाडी जवळील सागर मळामध्ये भिंत कोसळून दोन चिमुरडींचा मृत्यू, तृप्ती कुंभार, वैशाली कुंभार असे मयत मुलींची नावे

लोकलमध्ये होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय. सध्या सुरू असलेल्या 350 लोकलच्या फेर्‍यांऐवजी आता 500 फेऱ्या चालवल्या जाणार आहे. म्हणजेच 150 फेऱ्या अधिक. आता रोज पश्चिम रेल्वेच्या मार्गावर धावणार. गेल्या काही दिवसात लोकलमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या लोकांची गर्दी होताना निदर्शनास आले होते. त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवता येत नव्हते.
प्रियकराने स्वतःला घेतले पेटवून...
शिर्डीतील धक्कादायक घटना...
काल दुपारी स्वतः घेतले होते पेटवून...
लग्नास नकार दिल्याने अस्वस्थ झालेल्या प्रियकराने स्वतःला पेटवले. ..
उपचारादरम्यान तरूणाचा मृत्यू...
सार्थक बनसोडे या तरूणाचा झाला मृत्यू...
तरूणाला वाचवण्याच्या प्रयत्नात तरूणीचे वडील आणी तरूणीही जखमी...
शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल... सदर प्रकरणात पोलीसांचा अधिक तपास सुरु...
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय 31 डिसेंबरपर्यत पहिलीसाठी 6 वर्षं पूर्ण तर प्ले ग्रुप/नर्सरीसाठी 3 वर्षे पूर्ण असणे आवश्यक, 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार. शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे किमान वय निश्चिती करण्याबाबत आज शासन निर्णय जाहीर झाला आहे.
कोविड19 च्या काळात रेल्वे व इतर सार्वजनिक वाहतूक बंद आहे. याकाळात महिलावर्गाला कोणतीही अडचण होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने येत्या सोमवारपासून शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार महिला विशेष फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणावर आज संगमनेर सत्र न्यायालयात सुनावणी होणार असून मागील सुनावणीच्या वेळी अंनिसनं हस्तक्षेप करण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता. त्याला इंदोरीकरांच्या वकिलांनी आक्षेप घेतला असून आज न्यायालय हस्तक्षेप याचिकाअर्ज स्वीकारणार की फेटाळणार याकडं सर्वांच लक्ष लागलंय. सम तारखेला स्त्रीसंग झाला तर पुत्रप्राप्ती होते, असं जाहीर वक्तव्य किर्तनातून इंदोरीकरांनी केलं होतं. त्यानंतर PCNDT कायद्याअंतर्गत संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाला होता. दिवाणी न्यायालायने दिलासा दिल्यानंतर सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली असून आज याप्रकरणी तिसरी सुनावणी होणार आहे. जानेवारी महिन्यात नवी मुंबईतल्या उरणमध्ये इंदुरीकरांनी हे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याबाबत आक्षेप घेत अनेक सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलनातील कार्यकर्त्यांनी इंदोरीकरांवर कारवाईची मागणी केली होती. PCPNDT कायद्याखाली व्यक्ती दोषी आढळला तर तीन ते पाच वर्षांची शिक्षा आणि 10 ते 50 हजार रुपये दंडाचं प्रावधान आहे.
नऊ किलो गांजा घेऊन जाणार्‍या दोन महिलांना मुंबईतील अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. अंधेरीच्या तेली गल्ली परिसरात गांजा विक्री करण्यासाठी दोन महिला येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याठिकाणी सापळा रचून
बरखा विजय इंद्रेकर, गौरी सुरेश नवलेकर या दोन संशयित महिलांना थांबवून त्यांची चौकशी करत त्यांच्याजवळ असलेल्या बॅगची पाहणी केली. त्यांच्याकडे सुमारे सव्वादोन लाख किंमतीचा 9 किलो प्रतिबंधित गांजा हा अमलीपदार्थ सापडला. पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणून कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि अटक केली. हा गांजा कुठून आणला, त्यांच्या मागे कोण आहे तसेच या महिलांवर मुंबईत अजून कुठे गुन्हे दाखल आहेत याची चौकशी आता सुरु असल्याची माहिती अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय बेळगे यांनी दिली.
नऊ किलो गांजा घेऊन जाणार्‍या दोन महिलांना मुंबईतील अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. अंधेरीच्या तेली गल्ली परिसरात गांजा विक्री करण्यासाठी दोन महिला येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याठिकाणी सापळा रचून
बरखा विजय इंद्रेकर, गौरी सुरेश नवलेकर या दोन संशयित महिलांना थांबवून त्यांची चौकशी करत त्यांच्याजवळ असलेल्या बॅगची पाहणी केली. त्यांच्याकडे सुमारे सव्वादोन लाख किंमतीचा 9 किलो प्रतिबंधित गांजा हा अमलीपदार्थ सापडला. पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणून कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि अटक केली. हा गांजा कुठून आणला, त्यांच्या मागे कोण आहे तसेच या महिलांवर मुंबईत अजून कुठे गुन्हे दाखल आहेत याची चौकशी आता सुरु असल्याची माहिती अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय बेळगे यांनी दिली.
मुंबईतील दादरच्या इंदू मिल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याचा नियोजित पायाभरणी सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. निमंत्रणाचा वाद, मुख्य नेत्यांची अनुपस्थिती यामुळे आजचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. पुढच्या कार्यक्रमाची तारीख अजून निश्चित झालेली नाही.
सांगली : सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांची बदली करण्यात आली असून सांगलीच्या पोलीस अधीक्षक पदी दीक्षित कुमार गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रात्री उशिरा बदलीचे आदेश गृह विभागाच्यावतीने प्राप्त झाले आहेत.
पुणे : उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी पहाटे सहा वाजताच पोहचलेत. लॉकडाऊनमुळे कामात दिरंगाई आलीये का? कामगार पोहचलाय का? यासह अन्य माहिती त्यांनी घेतली. अजित पवार येणार म्हटल्यावर भल्या पहाटेच व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षितांसह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तयारी करून ठेवली होती. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनची पाहणी केली. यावेळी पवारांनी स्टेशनवर तिकीट विक्री कशी असेल याचा ही अनुभव घेतला, इतकंच नव्हे तर मेट्रोच्या रुळावर जाऊन काही अंतर प्रवास ही केला.
उद्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम इंदू मिल इथे होणार आहे. 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रम झाला होता. आता महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्याचा कार्यक्रम.
महाराष्ट्र राज्य शासनाकडून कर्नाटक व गुजरात राज्यात 100% प्रवासी वाहतुकीच्या सुरु केल्याच्या धर्तीवर रा.प. महामंडळाच्या बसेसद्वारे वाहतूक पूर्ण आसनक्षमतेने करण्यास मंजूरी. महाव्यवस्थापकांच विभाग नियंत्रकांना पत्र. तात्काळ अंमलबजावणी होणार.
महाराष्ट्र सदनात आज एकाच वेळी 17 कर्मचारी पॉझिटिव्ह
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या पुतळ्याच्या पायाभरणी समारंभवरून अनेक जण नाराज. या कार्यक्रमाला फक्त 16 जण आमंत्रित आहेत. कोरोनामुळे छोटेखानी कार्यक्रम. काही मंत्र्यांना तर उद्याच्या कार्यक्रमाची माहिती सुद्धा नाही. जे मंत्री उपस्थित असणार आहेत, त्यांनाही आज संध्याकाळी या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वात आधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आणि शरद पवार यांनी या स्मारकाचा आढावा घेऊन वारंवार आढावा घेतला होता. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या स्मारकाच्या महत्वाच्या कार्यक्रमाची माहिती नसल्याने यासबंधीत अनेक जण नाराज असल्याची चर्चा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, नितीन राऊत, वर्षा गायकवाड, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे, अस्लम शेख, मुख्य सचिव, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव स्थानिक आमदार सर्वणकर आणि दोन नगरसेविका स्थानिक आणि महापौर यांनाच आमंत्रण आहे. इंदु मिल आंदोलनाचे प्रणेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांना कोणतेही निमंत्रण नाही. प्रकाश आंबेडकर यांना देखील निमंत्रण नाही.
राज्यात पुन्हा बदल्यांचे आदेश. आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्ता पुण्याचे नवे पोलीस आयुक्त. ब्रिजेश सिंग यांची नऊ महिन्यानंतर त्यांची विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशासन इथे नियुक्ती करण्यात आली आहे.
पुण्यात वडगाव उड्डाण पुलावरून नवले ब्रिजकडून वारजेकडे जाणारी चार चाकी गाडी कठडे तोडून खाली कोसळली. ही घटना 15 तारखेला दुपारी साडेचारला वाजता घडली आहे. या गाडीत असणाऱ्या छाया देशमुख या महिला गाडी चालवत होत्या त्या सुखरूप बाहेर पडल्या. हा उड्डाणपूल जवळ 50 फूट खाली गाडी कोसळली. या औंधच्या रहिवासी असून त्या किरकोळ जखम झाली. गाडी उड्डाणपूला वरून खाली कोसळल्यानंतर त्या स्वतः गाडीतून उतरून बाहेर आल्या. त्यानंतर जवळ असलेल्या वाहतूक विभागातील पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केला. ही गाडी खाली कोसळली तेव्हा या लेनमध्येच एक मोठ्या ट्रकचा टायर फुटला होता. त्यामुळे तोल जाऊन ही गाडी खाली गेली असल्याने सिहगड पोलिसांनी या वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी या भागांमध्ये कायमच पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो हा दरवर्षीचा अनुभव आहे. मागील दोन दिवसांपासून औराद शहाजानी भागांमध्ये जोरदार पाऊस पडत होता. आज मात्र पावसाने तुफान बॅटिंग केली. अवघ्या तीन तासांमध्ये 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने या भागातील सर्व नदी-नाले यांना पुर आल्याची परिस्थिती आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेतील सर्व रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत. औराद शहाजानी या गावातील अनेक सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि त्यातच आज पडलेला पाऊस यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन ऊस पिकाचं खूप मोठे नुकसान झालं आहे. काढणीला आलेल्या सोयाबीनच्या शेतात पाणी थांबल्याने ती पिकं हातची गेली आहेत. तसेच ऊस शेती या जबरदस्त पावसाने आडवा झाला आहे. जोरदार पावसामुळे या भागातील वीजपुरवठा बराच काळ बंद होता. रस्ते वाहतुकीवरही या पावसाचा परिणाम जाणवत होता.
पोलीस भरतीत 13 टक्के जागा मराठा समाजासाठी बाजूला काढून ही बाब कायद्यानुसार तपासून मराठा समाजाला न्याय देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
सारथी संस्थेसह SEBC वर्गाच्या योजना नियोजन विभागाकडे हस्तांतरित. मराठा समाजासाठीच स्थापन करण्यात आलेली सारथी, छत्रपतीशाहू महाराज शिक्षण प्रशिक्षण आणि मनुष्यबळ विकास संस्था, पुणे ही संस्था नियोजन विभागाकडे हस्तांतरित करण्याचा महत्वाचा निर्णय. या संदर्भात सरकरने आदेश काढला आहे.

याबरोबरच SEBC प्रवर्गा साठीच्या राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना या दोन अत्यंत महत्त्वाच्या योजनाही बहूजन कल्याण विभागाकडून नियोजन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत.
पोलीस भरतीत 13 टक्के मराठा आरक्षण बाजूला ठेवा या मागणीसाठी विनायक मेटे यांनी आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. याबाबत अनिल देशमुख सकारात्मक असल्याचं मेटे यांनी सांगितलं. संध्याकाळी
साडेपाच वाजता याविषयी बैठक होणार आहे.
कणकवली शहरात जनता कर्फ्यूबाबत आज निर्णय घेण्यासाठी व्यापारी, सामाजिक संघटना, सर्व नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक यांची सोशल डिस्टन्स पाळत संयुक्त बैठक झाली. जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण कणकवली शहरात असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू पाळण्याबाबत उपस्थित व्यापाऱ्यांनी चर्चेतून झाला आणि जनता कर्फ्यू करण्याचं ठरवलं. कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नागरिकांना कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किमान आठ दिवस कडकडीत बंद पाळण्याचं आव्हान केलं आहे.
जयवंत काकडे असं या 93 वर्षीय आजोबांचं नाव असून त्यांना दोन आठवड्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर कल्याण पूर्वेतल्या स्टारसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी उपचारांना साथ देत यशस्वीपणे कोरोनावर मात केली. बुधवारी रुग्णालयाचे डॉक्टर्स, कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना निरोप दिला. यावेळी काकडे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आजोबा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानत रुग्णालयातून निरोप घेतला.
औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, त्यांचे पती औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी आपला एक महिन्याच्या पगार आणि औरंगाबाद महानगरपालिकेचे सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार देऊन कार्डियक ॲम्बुलन्स खरेदी केली. कोविडच्या संकटात रुग्णांना मदत व्हावी या हेतूने खरेदी करण्यात आलेल्या ॲम्बुलन्स पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कोविडच्या संकटात सरकारने माझं कुटुंब माझी जबाबदारी नवी संकल्पना मांडली आहे, त्यामुळे या कुटुंबाने कुटुंब म्हणून पार पाडलेली जबाबदारी नक्कीच मोलाची आहे .
विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. सायन रुग्णालया समोरील मुख्य रस्त्यावर अचानकपणे केलेल्या आंदोलनाचा फटका, कलम 188 अंतर्गत जमाव बंदी आदेश धुडकावणे, कलम 269 अंतर्गत संसर्जन्य आजार फैलावण्यास कारणीभूत ठरणे आणि कलम 341अंतर्गत बेकायदेशीररित्या प्रवेश करणे या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच आमदार तमिळ सेल्व्हन, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, नगरसेवक राजेश शिरवाडकर यांच्यासह जवळपास 20 ते 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुणे - होम क्वांरटाइन असलेल्या तरूणाने गळफास घेऊन केली आत्महत्या, पुण्यातील सहकारनगर भागातील धक्कादायक घटना, संदीप भोसले असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव , संदीप भोसले यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यातून बरे देखील झाले, मात्र डॉक्टरांनी होम क्वांरटाइन राहण्याचा सल्ला दिला होता, संदीप यांचे वडील कोरोनामुळे मृत झाले होते, आणि स्वतः कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने ते नैराश्येत होते
औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, त्यांचे पती औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी आपला एक महिन्याच्या पगार आणि औरंगाबाद महानगरपालिकेचे सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार देऊन कार्डियक ॲम्बुलन्स खरेदी केली. कोविडच्या संकटात रुग्णांना मदत व्हावी या हेतूने खरेदी करण्यात आलेल्या ॲम्बुलन्स पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कोविडच्या संकटात सरकारने माझं कुटुंब माझी जबाबदारी नवी संकल्पना मांडली आहे, त्यामुळे या कुटुंबाने कुटुंब म्हणून पार पाडलेली जबाबदारी नक्कीच मोलाची आहे .
नागपूर- नागपूर जिल्ह्यातील कन्हानमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर गुंडांचा चाकू हल्ला, हल्ल्यात रवी चौधरी हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी, त्यांना नागपूरच्या खाजगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल केले, कन्हान मधील गहूहिवरा चौकावरची 9 वाजताची घटना, जखमी पोलिसाची स्थिती गंभीर...
मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायन रुग्णालयासमोर केलेल्या आंदोलनामुळे दरेकरांवर कारवाई करण्यात आली आहे.
भारत-चीन सीमा वाद- आज राज्यसभमध्ये निवेदन करणार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, विरोधी पक्षांच्या प्रश्नांची उत्तरं देखील देणार
जायकवाडी प्रकल्प टप्पा क्रमांक 1 मधून मागील 5 दिवसापासून सोडण्यात आलेल्या व कुंडलिका,बिंदुसरा प्रकल्पातून होत असलेल्या विसर्गामुळे माजलगाव धरण 100%भरले असून प्रकल्पात पाण्याचा वाढता ओघ पहाता रात्री 8 ते 10 हजार क्यूसेक्स ने माजलगाव धरणातूम पाणी सोडण्यात येत आहे..माजलगाव धरणाच्या पाच दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय .
लवकरात लवकर लोकल सुरु करण्याचा निर्णय घ्या नाहीतर लवकरच सविनय कायदेभंग करणार, असा इशारा मनसेचा सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे. तसंच हे राज्य सरकारच्या हातात असताना उशीर का होतोय असा प्रश्नही त्यांनी विचारला. ते म्हणाले की, आम्ही एबीपी माझाची बातमी पाहिली. सरकारला, मुख्यमंत्र्यांना बाहेर पडायचं नाही, बघायचं नाही तर घरी बसून टीव्ही बघा. लोकल बंद असल्याने नोकरदार वर्गाचे हाल होत आहेत. लोक कल्याण डोंबिवलीवरुन 3-3 तास प्रवास करुन ड्युटीला जात आहेत हे सरकारला दिसत नाही. सरकराने लोकल सुरु केली नाही तर मनसे सविनय कायदेभंग आंदोलन करेल. तिकीट न काढता लोकलने मी प्रवास करेने. कारण जर सरकारला हे कळत नसेल, सर्वसामान्यांचा त्रास दिसत नसेल तर आम्हाला सरकारचे लक्ष वेधावे लागणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण. मला काल अस्वस्थ वाटत असल्याने डॉक्टरांकडे गेलो होतो. तपासणीदरम्यान माझा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती सध्या उत्तम असून स्वतःला आयसोलेट करुन घेतलं आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
परभणी जिल्ह्यात मागच्या 3 दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतोय. त्यामुळे अनेक ओढे नाले ओसंडून वाहत आहेत. नागरिक मात्र आपला जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यातुन जाण्याचा प्रयत्न करताहेत. अशाच 2 जणांना नागरिकांनी वाचवले आहे. परभणीच्या सेलु तालुक्यातील कान्हड येथील ओढ्यावरील पुल पावसामुळे वाहून गेला. मात्र, अशाच परिस्थितीतून 2 जण आपली दुचाकी घेऊन पुलावरून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पाण्याचा विसर्ग जास्त असल्याने हे दोघेही दुचाकीसह वाहून जात होते. परंतु, याच ठिकाणी थांबलेले नागरिक या दोघांच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी या दोघांसह दुचाकीहि सुरक्षितपणे बाहेर काढली आहे.
अमरावतीत काल (मंगळवारी) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही विद्यार्थी संघटनेने मला धमकी दिली होती, अशा धमक्यांना मी घाबरत नाही असे बोलले होते. याप्रकरणी अमरावती येथील ABVP चे 7 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. सायंकाळी सगळ्यांची सुटका केली. पण ABVP चे प्रदेशमंत्री रवी दांडगे यांना सोडलं नाही. त्यांची 24 तास उलटल्यावर पोलीस चक्रातून आता सुटका झाली.

मंत्री महोदयांना फक्त आम्ही भेटण्यासाठी वेळ मागितली वेळ मागणं जर धमकी असेल तर राज्यात प्रत्येक विद्यार्थी तुम्हाला वेळ मागेल तर ती धमकी होईल का असा सवाल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने उपस्थित केला आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून सर्वच पक्षांना मराठा आरक्षणासाठी निवेदन, मराठा आरक्षणाच्या निकालाने समाजाच्या प्रगतीला खीळ बसली, उदयनराजेंचं सर्वच पक्षातील नेत्यांना पत्रकाद्वारे निवेदन, मराठा समाजाच्या मनात सभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, मराठ्यांना आरक्षण देणे हे सर्वच पक्ष आणि लोकप्रतिनीधिची जबाबदारी, कायदेशीर मार्गाने मराठा आरक्षण अबाधित ठेवावे अशी उदयनराजेंची मागणी
सुप्रसिध्द मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री ललिता देसाई उर्फ 'आशू'
यांचे दीर्घ आजाराने पुण्यात दुःखद निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती त्रिहान तसेच एक मुलगा आहे. आशू यांनी सुमारे साठ वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अर्धशतकाहून अधिक काळ मराठी नाट्य व चित्रपटसृष्टीत तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. आचार्य अत्रे यांच्या 'ब्रह्मचारी' या नाटकात त्या किशोरीची भूमिका करत. अत्रे यांच्याच 'लग्नाची बेडी' या नाटकात आशू यांनी रंगवलेली रश्मी रसिकांच्या आठवणीत आहे.
राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 5 वी, इयत्ता 6 वी ते 8 वी व 9 वी ते 10 वी अशा तीन गटांमध्ये विद्यार्थी विभागले गेले होते. यामध्ये इयत्ता 5 वी हा एकाच वर्गाचा स्वतंत्र गट तयार झालेला होता...या गटाला माध्यमिक शाळांमध्ये प्राथमिक शाळांचे शिक्षक कार्यरत होते.

आरटीई अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार इयत्ता 1 ली ते 5 वी पर्यत शिक्षण 1 किमी परिसरात देणे आवश्यक आहे. त्यामुळे इयत्ता 5 वी हा वर्ग प्राथमिक शाळांना जोडणे अधिक संयुक्तिक ठरणार आहे. त्यामुळे 5 वी च्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात सुद्धा कमी प्रवास करून घरच्या जवळ शाळा उपलब्द करून देता येणार आहे.
कोल्हापुरातील सकल मराठा समाज आक्रमक, उद्या कोल्हापुरातून पुणे-मुंबईला जाणारं दूध रोखलं जाणार, मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याच्या निर्णयानंतर आंदोलन, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळी आंदोलनं सुरू राहणार, सर्वसामान्य नागरिकांना आमच्या आंदोलनाचा कोणताही त्रास होणार नाही
बाबरी मशीद विद्ध्वसं प्रकरणी ३० सप्टेंबर रोजी निर्णय येणार, तब्बल २७ वर्षांनंतर सीबीआय न्यायालय निकाल सुनावणार, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांचा आरोपींमध्ये समावेश
चक्क मुलानेच मित्रांच्या मदतीने आपल्या वडिलांची हत्त्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडलीय. पारनेर तालुक्यातील निघोज येथे कुकडी नदी पत्रात 28 ऑगस्ट रोजी अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर पोलिसांनी तातडीने तपास करत मृतदेहाची ओळख पटवली आणि हा मृतदेह पुणे जिल्ह्यातील कारेगाव येथील सतिष कोहकडे याचा असल्याचे समोर आले. त्यांनतर अहमदनगरचे स्थानिक गुन्हे शाखा आणि पारनेर पोलिसांनी तपस करत या खुनाचे रहस्य उलगडले. चक्क मुलानेच 2 मित्रांच्या मदतीने वडिलांची हत्त्या केल्याचे उघड झाले. सतिष कोहकडे याने अनैतिक संबंधांच्या कारणावरून पत्नीला मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून मुलगा प्रदीप कोहकडे याने मित्र हर्षल कोहकडे, श्रीकांत पाटोळे आणि 2 अल्पवयीन साथीदार यांच्या मदतीने वडिलांचा गळा आवळून हत्त्या केली. दरम्यान पोलिसांनी आरोपी मुलगा प्रदीप कोहकडे आणि त्याच्या 2 मित्रांना अटक केलीये. मात्र, घरगुती करणातून चक्क मुलानेच वडिलांची हत्त्या केल्याने पारनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक शहरात सध्या सोनसाखळी चोरांचा धूमाकळ बघायला मिळत असून यामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे भगूर परिसरातील विजयनगरमध्ये भाजीपाला खरेदीसाठी दुकानात आलेल्या उज्वला जाधव या महिलेच्या गळ्यातील 32 हजार रुपयांची सोन्याची पोत दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी काही सेकंदात लांबवली आणि ते फरार झाले. 13 सप्टेबरला भरदुपारी घड़लेली घटना सिसीटिव्ही कॅमेरात कैद झाली असून याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे शहरात पाच दिवसात पाच जबरी चोरीच्या घटना समोर आल्या असून चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वार काढल्याने नवे पोलिस आयुक्त दिपक पांडेंसमोर गुन्हेगारीवर आळा बसवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालय.
बीड जिल्ह्यातील भाजप आमदार सुरेश धस यांना अटक. मागच्या दीड तासांपासून सुरेश धस आष्टी पोलिसांच्या ताब्यात होते. अखेर त्यांची सुटका करण्यात आली आहे.
मराठा आरक्षण पूर्ववत द्यावे या मागणीसाठी राज्यभर अनेक संघटना अनेक राजकीय पक्ष आणि व्यक्ती हा लढा देतायत, मात्र या मागणीमध्ये एकवाक्यता बघायला मिळत नाही म्हणून मराठा आरक्षणाच्या या लढ्याचे नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी करावं असं मत विनायक मेटे यांनी व्यक्त केल आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सर्वसामान्यांच्या उपचार मिळत नाहीत, हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे, अशा याचिकेवर राज्य सरकारला नोटीस, औरंगाबाद खंडपीठात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांसमोर आज सुनावणी झाली. मुख्य सचिव आणि प्रधान सचिवांना दोन आठवड्यांच्या आत उत्तर देण्याच्या नोटीस, राज्याच्या मुख्यमंत्री सहायता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांची याचिका
कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचं आंदोलन, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, मोदी सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार असून केंद्र सरकारने तात्काळ हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी आज, बुधवार 16 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करत आहोत, असं थोरात म्हणाले.
कोल्हापूर - सेनापती कापशीत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खासगी बाजारला काल पहाटे लागली आग ,

आगीत संपूर्ण माल जळून खाक, बाजार मालक बाजीराव मारुती तेलवेकर यांचे सुमारे पंधरा लाखाचे नुकसान,

शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी अंदाज, तेलांच्या डब्यामुळे आग भडकली,

साखर कारखान्यांच्या अग्निशामक दलाने दोन तासांनंतर आग विझवली
देवगड : समुद्रातील खराब हवामान, वादळसदृश स्थिती यामुळे कोकण किनारपट्टीवरील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या देवगड बंदरात जिल्यासह गुजरातमधील 34 आणि दीव-दमणमधील दोन मच्छीमारी नौका आश्रयाला आहेत. तर बंदरात बाहेरून आलेल्या एकूण 36 नौकांवर एकूण 299 मच्छीमार असल्याची माहिती सागरी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंखे यांनी दिली आहे.
बेळगाव -जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाचा कहर सुरूच असून त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. बेळवडी,केंगनूर, जालिकोप्प,इंगळगी,वक्कुंद, कोरिकोप्प आणि होसूर गावांत शेतात आणि घराघरात पाणी शिरले. पावसामुळे अनेक नाले,ओढे तुडुंब भरून वाहत आहेत.शेतात पाणी साठल्यामुळे पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे.रस्त्यावर पाणी साठल्यामुळे वाहतूक देखील ठप्प झाली होती.गावातील रस्त्यावरून ओढ्याप्रमाणे पाणी वाहत होते.घरात पाणी शिरल्याने पाणी बाहेर काढण्यासाठी घरातील लोकांची धडपड सुरू होती.
केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध करत कांदा निर्यात बंदी‌ मागे घेण्यात यावी म्हणून शेतकरी संघर्ष संघटनेतर्फे आज सकाळी मनमाड जवळील नांदगांव - चाळीसगाव रस्त्यावर रास्ता - रोको आंदोलन करण्यात आले.आमच्या भावना वरिष्ठांना कळवून कांदा निर्यातबंदी त्वरित मागे घेण्यात यावी अशी मागणी करत नांदगावचे तहसीलदार उदय कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
मुखेड शहर आणि तालुक्यात रात्री तुफान पाऊस झाला तर काही भागात अतिवृष्टी झाली यामुळे मुखेड शहरालगत असलेल्या मोती नाल्यास पूर आला रात्री तीन तास या मार्गावरील वाहतूक बंद होती नाल्या लगत असलेल्या स्मशान भूमीत पाणी शिरल्याने तिनी भाग च्या संरक्षण भिंती कोसळल्या तर कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या निवारा ही वाहून गेला शहरातील फुले नगर भागातील अनेक घरांमध्ये नाल्याचे पाणी घुसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले तर अनेक घराची पडझड झाली शहरालगत असलेल्या शेतामध्ये पाणी घुसले असून शेताला तलावाचे स्वरूप आले आहे.मागील 24 तासात 133 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आज मुखेड तालुक्यातील कासराळी येथे पुरामुळे आटो रिक्षा प्रवाशांन सह वाहून जाण्याची घटना घडली आहे.कासराळी गावा जवळील पुलावरून प्रवासी आटो रिक्षा जात असतांना अचानक पाण्याचा स्तर वाढल्यामुळे आटो रिक्षा पुलावरून घसरत पाण्यात पडला.परंतु गावकऱ्यांच्या मदतीने वाहून जाणारी रिक्षा व त्यातील पाच प्रवाशि यांना बाहेर काढण्यात आले.सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
धुळे जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 4 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झालाय . तर दिवसभरात 98 कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झालीय .जिल्ह्यात आतापर्यंत 330 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. मंगळवारी दिवसभरात 210 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 542 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत . तर सध्या 1 हजार 258 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत . धुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 11 हजार 130 वर गेलीय .
भाजपाचे विद्यमान जिल्हा सरचिटणीस व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुदन बांदिवडेकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ओरोस येथील जिल्ह्या रुग्णालयात त्याचावर उपचार सुरू होते. आज ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने बांदिवडेकर यांच्या निकटवर्तीयांनी अधिक उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलविण्यासाठी येत होते मात्र तत्पूर्वीच बांदिवडेकर यांची प्राणज्योत मालवली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे ते निकटवर्तीय होते. 23 सप्टेंबर रोजी त्याचां वाढदिवस होता, वाढदिवसाच्या सात दिवस आधीच काळाने घाला घातला.
सातारा-
कांदा निर्यात बंदी ही केंद्र सरकारची चूक, खासदार उदयनराजे भोसले यांचा केंद्र सरकारला घरचा आहेर, निर्यात बंदी म्हणजे लॉकडाऊन काळात कर्जबाजारी शेतकऱ्यांना संकटात नेणारा निर्णय, पियुष गोयल यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करणार असल्याचेही उदयनराजेंची माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री प्रत्यक्ष हजर राहणार नाहीत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लावणार हजेरी.17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो.

मुंबई : व्यावसायिक वाहन मालकांना राज्य सरकारचा मोठा दिलासा, 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंत वाहनांच्या वार्षिक करावर 50 टक्के सूट मिळण्यासंबंधी अधिसूचना जारी, खाजगी सेवा आणि व्यावसायिक वाहनांवर मिळणार सूट, यामध्ये मालवाहतूक, पर्यटक, खनिजे, खाजगी सेवा आणि शालेय विध्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश, मात्र 31 मार्च, 2020 पूर्वी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ

पुणे पोलिसांनी मराठा समाजातील कार्यकर्त्यांना बजावल्या नोटीसा, आंदोलन न करण्याबाबतीत पुणे पोलिसांची नोटीस, 17 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मराठा समाजाचं आंदोलन, नोटीसांचा निषेध करत कार्यकर्ते आंदोलनावर ठाम
शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष टोकाला, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना धमकीचा फोन, ABVP च्या कार्यकर्त्यानं धमकीचा फोन केल्याचा संशय, पोकळ धमक्यांना घाबरत नाही, विद्यार्थ्यांच्या हिताचं काम करणार, सामंतांनी व्यक्त केला विश्वास, उदय सामंत या धमकीची तातडीनं तक्रार करणार, सामंत यांच्या पीएच्या फोनवर आला धमकीचा फोन, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना आला होता धमकीचा फोन
शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष टोकाला, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना धमकीचा फोन, ABVP च्या कार्यकर्त्यानं धमकीचा फोन केल्याचा संशय, पोकळ धमक्यांना घाबरत नाही, विद्यार्थ्यांच्या हिताचं काम करणार, सामंतांनी व्यक्त केला विश्वास, उदय सामंत या धमकीची तातडीनं तक्रार करणार, सामंत यांच्या पीएच्या फोनवर आला धमकीचा फोन, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना आला होता धमकीचा फोन
निवृत्त नौदल अधिकारी मारहाण प्रकरणात भाजप आमदार अतुल भातखळकर उच्च न्यायालयात दाद मागणार. राजकीय दबावापोटी पोलीस बनवाबनवी करत असल्याचा आरोप.
सायन येथील लोकमान्य टिळक पालिका रुग्णालयात मृतदेहाची झालेली आदलाबदल प्रकरणात पालिका रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर जोरदार टीका होत आहे. आज भाजप या प्रकरणात आक्रमक झाली असून भाजप आमदार कॅप्टन तमिळ सिल्व्हन, आमदार कालिदास कोलंबकर यांच्या यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सायन रुग्णालयासमोर आंदोलन केले. या प्रकरणात मृत्यू पावलेले आणि मृतदेह बदली झालेला तरुण अंकुश सुरवाडे याला न्याय मिळावा.त्याच्या किडनी जवळ नक्की कसले ऑपरेशन करण्यात आले होते? यात किडनी रॅकेटची शक्यता असल्याने फक्त शवगृहातील कर्मचारी नाही तर संबंधित डॉक्टरांवर देखील अटक होऊन कारवाई करण्याची मागणी आमदार सेलव्हन यांनी केली आहे.तो पर्यंत हे आंदोलन सुरू राहील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
अभिनेत्री कंगना रनौतचा मुंबई महापालिकेविरोधात दोन कोटींचा दावा, ऑफिसमध्ये बेकायदेशीर कारवाई करत नुकसान केल्याचा आरोप, कंगनाच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात पुढच्या आठवड्यात सुनावणी
जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने माजलगाव धरण 92 टक्के भरले आहे.. गोदावरी नदीतील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने गोदाकाठच्या गावांना पोलीस प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.. माजलगाव धरणाची पाणी पातळी ही 431.80 मीटर आहे..सध्या माजलगाव धरणात 429.30 मीटर पाणी आले आहे.. आता कोणत्याही क्षणी धरण संपूर्ण भरू शकते म्हणून माजलगाव पोलिसांनी गोदाघाटाच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.. माजलगाव धरण भरल्याने बीड सह माजलगाव शहर आणि इतर 20 ते 22 गावांना दिलासा मिळाला आहे.
2016 मध्ये माजी सैनिक सोनू महाजन यांना केलेल्या मारहाणी प्रकरणी भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे की, "२०१६ साली भाजपचे तेव्हाचे आमदार व आताचे खासदार उन्मेष पाटील व इतरांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. तेव्हाच्या भाजप सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही. यासंदर्भात मला मिळालेल्या अनेक निवेदनांनुसार पोलिसांना पाटील यांची या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. २०१६ साली हा गुन्हा घडला होता. पण तेव्हा भाजपचे सरकार असल्याने पाटील यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही. त्यानंतर २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई पाटील यांच्यावर झाली नाही.
2016 मध्ये माजी सैनिक सोनू महाजन यांना केलेल्या मारहाणी प्रकरणी भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे की, "२०१६ साली भाजपचे तेव्हाचे आमदार व आताचे खासदार उन्मेष पाटील व इतरांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. तेव्हाच्या भाजप सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही. यासंदर्भात मला मिळालेल्या अनेक निवेदनांनुसार पोलिसांना पाटील यांची या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. २०१६ साली हा गुन्हा घडला होता. पण तेव्हा भाजपचे सरकार असल्याने पाटील यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही. त्यानंतर २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई पाटील यांच्यावर झाली नाही.
पिंपरी चिंचवड शहरातील खासदार आणि आमदारांच्या घराबाहेर संबळ वाजवत आंदोलन केलं जातंय. मराठा आरक्षण स्थगिती उठवावी अशी मागणी आहे. पिंपरी चिंचवड शहरातील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा युवा मराठा महासंघ, मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने हे आंदोलन केले जातंय.
मुंबई : दिड महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पेडर रोडहून बाबुलनाथ जंक्शनच्या दिशेनं जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. 5 ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसानंतर इथम जी दरड कोसळली होती, त्यातला बराचसा मलबा आता हटवण्यात आला असून, लवकरच पालिका प्रशासन इथं दुरूस्तीचं काम हाती घेणार आहे. मात्र त्यासाठी आयआयटी मुंबईच्यावतीनं जो भौगोलिक अहवाल प्राप्त होणार आहे, त्याची पालिकेला प्रतिक्षा आहे. मात्र मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, सकाळच्यावेळी हाजीअलीहून बाबुलनाथच्या दिशेनं जाण्यासाठी आता केप्म्स कॉर्नरहून गिरगावच्या दिशेनं वळसा घालून जाण्याची गरज नाही. तेव्हा दक्षिण मुंबईतील ट्राफीकची समस्या पेडर रोडची ही मार्गिका खुली झाल्यानं ब-यापैकी कमी होणार आहे.
म्हाडा लवकरच मुंबई आणि ठाणेकरांना 'गिफ्ट' देणार असून मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
केंद्र सरकारने काल अचानक कांदा निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पासरली आहे. कोरोनामुळे अनेक दिवस मार्केट बंद होते, तर वातावरणामुळे कांदा चाळीत सडून खराब झाला. मार्चमध्ये निर्यात बंदी उठवल्यानंतर सुद्धा कांद्याचे दर 700 ते 800 रुपया एवढे राहिले, मात्र गेल्या काही दिवसांपासून कांद्याची मागणी वाढली आणि कांद्याचे भाव वाढू लागले, काल 3000 हजार रुपये दर पोहचताच ठीक ठिकाणच्या बंदरावर कंटेनर थांबविण्यात आले. त्यामुळे दर खाली आले आणि संध्याकाळी निर्यात बंदीची घोषणा झाली.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मात्र शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय.
केंद्र सरकारने काल अचानक कांदा निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पासरली आहे. कोरोनामुळे अनेक दिवस मार्केट बंद होते, तर वातावरणामुळे कांदा चाळीत सडून खराब झाला. मार्चमध्ये निर्यात बंदी उठवल्यानंतर सुद्धा कांद्याचे दर 700 ते 800 रुपया एवढे राहिले, मात्र गेल्या काही दिवसांपासून कांद्याची मागणी वाढली आणि कांद्याचे भाव वाढू लागले, काल 3000 हजार रुपये दर पोहचताच ठीक ठिकाणच्या बंदरावर कंटेनर थांबविण्यात आले. त्यामुळे दर खाली आले आणि संध्याकाळी निर्यात बंदीची घोषणा झाली.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मात्र शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय.
केंद्र सरकारने काल अचानक कांदा निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पासरली आहे. कोरोनामुळे अनेक दिवस मार्केट बंद होते, तर वातावरणामुळे कांदा चाळीत सडून खराब झाला. मार्चमध्ये निर्यात बंदी उठवल्यानंतर सुद्धा कांद्याचे दर 700 ते 800 रुपया एवढे राहिले, मात्र गेल्या काही दिवसांपासून कांद्याची मागणी वाढली आणि कांद्याचे भाव वाढू लागले, काल 3000 हजार रुपये दर पोहचताच ठीक ठिकाणच्या बंदरावर कंटेनर थांबविण्यात आले. त्यामुळे दर खाली आले आणि संध्याकाळी निर्यात बंदीची घोषणा झाली.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मात्र शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय.
बीड जिल्ह्यामध्ये एकीकडे कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पर्यटन स्थळावर बंदी असतानाही लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सौताडाच्या धबधब्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलं आणि हेच पाहण्यासाठी परिसरातील लोक अक्षरशः गर्दी करत आहेत. निसर्गाचे विहंगम दृश्य या ठिकाणी पर्यटकांना भुरळ घालत असतं. उंच डोंगरावरुन पडणारं पाणी आणि पायथ्याशी रामेश्वर मंदिर यामुळे या परिसरातील लोक याठिकाणी पर्यटनाचा बेत आखत असतात. मात्र सध्या कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत असताना आणि परवानगी नसताना लोक कोणतीही काळजी न घेता या परिसरामध्ये गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. विशेष म्हणजे सौताडा गावामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तरीसुद्धा या पर्यटकांना कोणीही आवर घालत नाही. म्हणूनच अशा पर्यटकांवर बंदी घालण्याची मागणी नागरिक करत आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये एकीकडे कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पर्यटन स्थळावर बंदी असतानाही लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सौताडाच्या धबधब्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलं आणि हेच पाहण्यासाठी परिसरातील लोक अक्षरशः गर्दी करत आहेत. निसर्गाचे विहंगम दृश्य या ठिकाणी पर्यटकांना भुरळ घालत असतं. उंच डोंगरावरुन पडणारं पाणी आणि पायथ्याशी रामेश्वर मंदिर यामुळे या परिसरातील लोक याठिकाणी पर्यटनाचा बेत आखत असतात. मात्र सध्या कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत असताना आणि परवानगी नसताना लोक कोणतीही काळजी न घेता या परिसरामध्ये गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. विशेष म्हणजे सौताडा गावामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तरीसुद्धा या पर्यटकांना कोणीही आवर घालत नाही. म्हणूनच अशा पर्यटकांवर बंदी घालण्याची मागणी नागरिक करत आहेत.
2016 मध्ये माजी सैनिक सोनू महाजन यांना केलेल्या मारहाणी प्रकरणी भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे की, "२०१६ साली भाजपचे तेव्हाचे आमदार व आताचे खासदार उन्मेष पाटील व इतरांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. तेव्हाच्या भाजप सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही. यासंदर्भात मला मिळालेल्या अनेक निवेदनांनुसार पोलिसांना पाटील यांची या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. २०१६ साली हा गुन्हा घडला होता. पण तेव्हा भाजपचे सरकार असल्याने पाटील यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही. त्यानंतर २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई पाटील यांच्यावर झाली नाही.
आज कांद्याला थोडा भाव मिळत आहे म्हणून केंद्र सरकारच्या पोटात पोटशूळ उठला आहे. त्यामुळे निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला जात आहे. परंतु कांद्याचा पूर्ण हंगाम शेतकऱ्यांचा वाया गेला आहे. फक्त 2 ते 4 रुपये किलो भाव मिळत होता. या भावाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही. पुढे भाव मिळतील या अपेक्षेने कांदा साठवला. पण तो कांदाही चाळीत सडला. थोडाफार कांदा शिल्लक राहिलाय. त्याला आता समाधानकारक दर मिळतोय पण झालेलं नुकसान बघता.शेतकऱ्यांच्या हातात काही राहणार नाही. त्यातच निर्यात बंदीमुळे भाव पडले तर शेतकऱ्यांना मिळत असणाऱ्या गवताच्या काडीचा आधारही जाईल आणि कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होतील. हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप म्हणाले.
आज कांद्याला थोडा भाव मिळत आहे म्हणून केंद्र सरकारच्या पोटात पोटशूळ उठला आहे. त्यामुळे निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला जात आहे. परंतु कांद्याचा पूर्ण हंगाम शेतकऱ्यांचा वाया गेला आहे. फक्त 2 ते 4 रुपये किलो भाव मिळत होता. या भावाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही. पुढे भाव मिळतील या अपेक्षेने कांदा साठवला. पण तो कांदाही चाळीत सडला. थोडाफार कांदा शिल्लक राहिलाय. त्याला आता समाधानकारक दर मिळतोय पण झालेलं नुकसान बघता.शेतकऱ्यांच्या हातात काही राहणार नाही. त्यातच निर्यात बंदीमुळे भाव पडले तर शेतकऱ्यांना मिळत असणाऱ्या गवताच्या काडीचा आधारही जाईल आणि कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होतील. हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप म्हणाले.
हिंगोलीतील औंढा येथील पंचायत समितीचे सभापती यांच्या निवासस्थानी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. यामध्ये पावणेतीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या छाप्यात पंचायत समिती उपसभापती, दोन सदस्यांसह एकूण अकरा जणांना पकडले आहे. रात्री उशिरा पोलिसांनी याप्रकरणी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जुगार खेळण्यासाठी चक्क शासकीय निवासस्थानाचा वापर करण्यात आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
हिंगोलीतील औंढा येथील पंचायत समितीचे सभापती यांच्या निवासस्थानी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. यामध्ये पावणेतीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या छाप्यात पंचायत समिती उपसभापती, दोन सदस्यांसह एकूण अकरा जणांना पकडले आहे. रात्री उशिरा पोलिसांनी याप्रकरणी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जुगार खेळण्यासाठी चक्क शासकीय निवासस्थानाचा वापर करण्यात आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
कर्नाटक परिवहन महामंडळाच्या भंगारात काढण्यात येणाऱ्या बसचा वापर महिलांसाठी रेस्ट रुम म्हणून वापर करण्यात येणार आहे. बंगलोर मॅजेस्टिक बस स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग यशस्वी ठरल्यामुळे बेळगावसह राज्यातील अन्य शहरात हा प्रयोग राबवण्यात येणार आहे.
व्हॉइस ओव्हर-भंगारात काढण्यात येणाऱ्या बसमध्ये नूतनीकरण करुन त्यामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह आणि बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून बस स्थानकावर येणाऱ्या महिला या बसचा वापर करत आहेत. बसला उशीर असल्यास विश्रांती घेणे, लहान मुलांना दूध पाजण्यासाठी या सुविधेचा वापर महिला करत आहेत. बस स्थानकावर या रेस्ट रुमची सुविधा असलेल्या बस थांबणार असून त्याचा उपयोग महिलांना करता येणार आहे. हा उपक्रम राबवण्यासाठी परिवहन मंडळ सामाजिक संस्थांची मदत घेणार आहे. रेस्ट रुम बसमुळे महिलांना चांगली सुविधा प्राप्त होणार आहे.
अभिनेते ,निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांना विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून संधी द्यावी अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पुण्यातील सलाम पुणे या संस्थेने केली आहे.
पंढरपूर परिसरात रात्रभर पावसाची संततधार सुरू, पहाटेपासून पावसाचा जोर ओसरला मात्र अजूनही रिमझिम पाऊस सुरू

पार्श्वभूमी

राज्यसभेत कृषी विधेयकावर चर्चेवेळी शरद पवार अनुपस्थित, विधेयकावर शिवसेना-राष्ट्रवादीची संदिग्ध भूमिका


राज्यसभेत आज महत्त्वाच्या तीन कृषी विधेयकांना मंजुरी मिळाली. त्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वातावरण पेटलेलं आहे. सरकारने बहुमताच्या जोरावर ही तीन विधेयक लोकसभे पाठोपाठ राज्यसभेतही मंजूर केली. पण या सगळ्या गदारोळात महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांची भूमिका मात्र संदिग्ध राहिली.


राष्ट्रवादीच्या वतीने खासदार प्रफुल पटेल यांनी चर्चेत जे मत मांडलं त्यावरून राष्ट्रवादीचा थेट विरोध स्पष्ट होत नाही. असं क्रांतिकारी विधेयक आणण्याआधी शरद पवार, प्रकाश सिंग बादल यासारख्या ज्येष्ठ अनुभवी नेत्यांशी चर्चा करायला हवी होती इतकीच त्यांची अपेक्षा होती. शिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सभागृहाच्या कामकाजाबद्दल काटेकोर असतात. पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या विधेयकाला ते अनुपस्थित होते.


सरकारकडून शेतकऱ्यांच्या मृत्यूचं फर्मान; कृषि विधेयकावरुन राहुल गांधी यांचा मोदी सरकार वर हल्ला


काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कृषि विधेयकावरुन मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. या बिलाला शेतकऱ्यांच्या मृत्यूचे फर्मान असल्याचे राहुल गांधी म्हणाले आहेत. जे शेतकरी जमीनीतून सोनं पिकवतात त्यांना मोदी सरकारच्या अहंकारामुळे दुःख भोगावं लागत आहे.


राहुल गांधी यांनी ट्वीट मध्ये म्हटलय की "जे शेतकरी जमीनीतून सोनं पिकवतात, मोदी सरकारच्या अहकारामुळे त्यांना दुःख भोगावं लागत आहे. राज्यसभेत आज ज्याप्रकारे कृषि विधेयकाच्या रुपात सरकारने शेतकऱ्यांच्या मृत्यूचं फर्मान काढलं, त्यामुळे लोकशाहीची मान खाली गेलीय"


रुग्णाला 'ऑक्सिजन' किती द्यायचा हा अधिकार डॉक्टरांचाच!


रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना उपचाराचा भाग म्हणून जो ऑक्सिजन दिला जातो तो किती द्यायचा असा आरोग्य विभागाने अजब फतवा काढल्याने वैद्यकीय क्षेत्रात कमालीची संतप्तता निर्माण झाली आहे. गेले काही दिवस राज्यातील विविध भागात ऑक्सिजनची टंचाई भासत असल्याच्या तक्रारी होत असतानाच, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑक्सिजन वापराचे ऑडिट करून वॉर्डमध्ये दाखल झालेल्या रुग्णाला अमुक इतका आणि अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या रुग्णाला अमुक इतकाच ऑक्सिजन द्यावा असा अजब फतवा काढला. शिवाय ऑक्सिजन गळतीचे प्रकार होणार नाही याची सर्व रुग्णालयांनी नोंद घ्यावी असे निर्देशित करण्यात आले. हा फतवा वैद्यकीय उपचारांना हरताळ फासणारा ठरणार असून अशा पद्धतीने रुग्णाचे उपचार करणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी मत व्यक्त केले. दरम्यान, राज्य कोरोना विशेष कृती दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी स्वतः याविषयी नापंसती व्यक्त करून अशा पद्धतीचा नियम योग्य नसून यासंदर्भात राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून हा नियम बदलावा अशी विनंती करणार आहोत असे स्पष्ट केले.


मयंक अगरवालची धडाकेबाज खेळी अपयशी, आयपीएलमध्ये काल रंगलेल्या सामन्यात पंजाबचा दिल्लीकडून सुपर ओव्हरमध्ये पराभव


आयपीएलच्या 13 व्या सीजनच्या दुसऱ्याच सामन्यात सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. सुपरओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर सहज मात केली. विजयासाठी पंजाबने दिल्लीला अवघ्या 3 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पंजाबकडून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मयंक अगरवालला सुपरओव्हरमध्ये न उतरवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही संघांनी 157-157 धावा केल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्याआधी मयंक अगरवालने धडाकेबाज खेळी करत 59 चेंडूत 89 धावा केल्या. मात्र पंजाबला विजय मिळवून देऊ न शकल्याने त्याची खेळी व्यर्थ गेली. मार्क्स स्टॉयनिसने आणि कागिसो रबाडा दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार ठरले.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.