COVID-19 Cases in India : कोरोना व्हायरस (Covid-19) भारतात पुन्हा परतला आहे. देशामध्ये कोरोना रूग्णांची संख्या 1 हजार 200 पर्यंत पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) कोव्हिड-19 चे 86 रुग्ण सापडले आहेत. तर पश्चिम बंगाल, दिल्ली, राजस्थान आणि इतर राज्यातसुद्धा सातत्याने कोरोना व्हायरस पसरत आहे. यामुळे राज्य सरकारकडून रुग्णालयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करण्यात आली आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात सर्वात जास्त कोरानाचे रुग्ण हे केरळ राज्यात आहेत. यानंतर महाराष्ट्र आणि दिल्ली येथे रुग्ण आहेत. तर इतर राज्यात सुद्धा कोरानाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होताना दिसतेय. काही राज्यात मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. तर पश्चिम बंगालमध्ये नव्याने कोरोनाबाधित 5 रुग्ण झाले आहेत. महाराष्ट्रात 86 पर्यंत रुग्णांची संख्या झाली आहे.
राजस्थानमध्ये कोरोनाची लागण
राजस्थानमध्ये कोरानाचे 7 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर, संपूर्ण राज्यात एकूण संख्या 39 पर्यंत पोहोचली आहे. राजस्थानमध्ये कोरोनाबाधित झाल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांमध्ये दीड महिन्याचे आणि दोन महिन्यांचे बाळ तसेच 68 वर्षांचा एक पुरूष यांचा समावेश आहे.
राज्यामध्ये आत्तापर्यंत 11 जिल्ह्यामध्ये कोरोना पसरल्याची माहिती मिळाली आहे. तर सर्वाधिक रूग्ण हे जयपूर या जिल्ह्यात सापडले आहेत. या व्यतिरिक्त जोधपूर जिल्ह्यात 6, उदयपुर मध्ये 4, डीडवानामध्ये 3 रूग्ण, अजमेर आणि बीकानेर 2-2 रुग्ण तर बालोतरा, दौसा, फलोदी, सवाई माधोपूर या जिल्ह्यात 1 रूग्णांची लागण झालेली माहिती मिळाली आहे.
कोव्हिड-19 च्या गाइडलाईन
महाराष्ट्र आणि इतर राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तर, रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी स्पेशल वॉर्ड बनवण्यात आला आहेत. कोरोनाची लागण झालेल्या लोकांसाठी इतरांपासून दूर ठेवले जात आहे. यामुळे इतर लोक कोरोनाबाधित होणार नाहीत. राज्य सरकारने कोव्हिड-19 ला घेऊन गाईडलाईनसुद्धा जारी केले आहे.
हे ही वाचा :