Jalgaon News: जळगावच्या जामनेरल तालुक्यातील (Jalgaon News) एका जोडप्याला विवाह जुळलेला असताना देखील काही न काही कारणाने विवाह होण्यास अडचणी येत होत्या, ज्यामुळे या दोघांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन 'शुभमंगल सावधान' केलं आहे. इर्शाद आणि अमीन असं या जोडप्याचं नाव असून जामनेर पोलीस ठाण्यात हा विवाह पार पडला आहे. विशेष म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी अर्थात व्हेलंटाईन डे दिवशी हा विवाह पार पडला आहे.
इर्शाद तडवी आणि अमीन तडवी या दोघांचा गेल्या काही महिन्यांपासून विवाह जुळवण्यात आला होता. पण कोणत्या न कोणत्या कारणामुळे हा विवाह रखडत होता. विवाह ठरल्यापासून दोन्ही जोडप्यांना एकमेकांसोबत लग्नाची आतुरता लागली होती, मात्र विवाह करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे हे दोघेही चार दिवसांपूर्वी घरातून पळून गेले. यानंतर दोन्ही कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेले हे दोघेही अचानक जामनेर पोलिसांत हजर झाले.
'व्हेलंटाईन डेला आमचं लग्न लाऊन द्या'
अचानकपणे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर इर्शाद आणि अमीन या दोघांनीही व्हेलंटाईन डे असल्याने ''आज (सोमवारी) प्रेम दिवस आहे, या दिवसाच्या निमित्ताने आमचा विवाह लाऊन द्या' अशी विनंती पोलिसांना केली. दरम्यान दोघांच्या घरच्यांचा विरोध नसल्याने अखेर पोलीस ठाण्यात हा विवाह पार पडला. यावेळी उपस्थितांसह पोलिसांनी दोघांच्या विवाहाला शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं.
हे ही वाचा :
- राज्यातील 16 शहरांचा वीज वितरण परवाना खासगी कंपन्यांना देण्याच्या हालचाली
- नांदेडच्या शेतकऱ्याचा नाद खुळा, 35 हजारात तयार केली Electric Bike
- मृत मतदार जिवंत झाले आणि मतदान करून गेले; कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीतला प्रकार उघड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha